आता डॉक्टरांनाही म्हणता येणार आम्ही नाही जा; वैद्यकीय आयोगाच्या अधिसूचना जारी

आता डॉक्टरांनाही म्हणता येणार आम्ही नाही जा; वैद्यकीय आयोगाच्या अधिसूचना जारी

New Delhi : डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (RMPs) डॉक्टरांबरोबर गैरवर्तन, मारहाण आणि हिंसाचार करणाऱ्या रुग्णांना किंवा नातेवाईकांना डॉक्टर उपचार करण्यास नकार देऊ शकतात.(Medical Commission notification issued Doctor will say, I am not doing treatment)

Dilip Valase Patil : मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं; ‘त्या’ चर्चांना वळसे पाटालांचा दुजोरा

आरएमपीला जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, रुग्णांच्या असभ्य वर्तनाविरोधात डॉक्टर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करु शकतात, त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवले जाईल. हे नियम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI)च्या मेडिकल एथिक्स कोड 2002 ची जागा घेतील. अशा रुग्णांना उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना पहिल्यांदाच मिळणार आहे.

फ्लॉप शोनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलचं वर्चस्व कायम; विराटलाही टाकलंय मागं…

आरएमपी अधिसूचनेमध्ये सांगितल्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता, कोणत्या रुग्णांवर उपचार करायचे हे डॉक्टरांना ठरवता येणार आहे. आरएमपीची रुग्णांप्रति जबाबदारी आहे तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. रुग्णांच्या उपचाराशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही सांगावी आणि विनाकारण केस पाहण्यापासून दूर ठेवू नये. रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला शुल्काची माहिती द्यावी लागणार आहे.

रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यात होणारा खर्चही त्यांनी नातेवाईकांना सांगणे गरजेचे आहे, असेही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले आहे. अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांनी औषध कंपन्यांकडून कोणतीही भेटवस्तू, प्रवास सुविधा, सल्ला शुल्क किंवा मनोरंजन स्वीकारणे टाळावे. आरएमपीने सेमिनार, कार्यशाळा, परिसंवाद, फार्मास्युटिकल कंपन्यांची परिषद किंवा त्यांच्याशी संबंधित आरोग्य सेवांपासून दूर राहावे.

यापूर्वी केरळमधील कोल्लममध्ये मेडिकलसाठी आणलेल्या आरोपींनी हाऊस सर्जन डॉय वंदना दास यांची हत्या केली होती. त्यावर केरळ उच्चन्यायालयाने स्वतः विशेष बैठकीदरम्यान सुनावणीवेळी सांगितले की, जर तुम्ही डॉक्टरांना संरक्षण देऊ शकत नसाल तर रुग्णालये बंद करा, तसेच यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांचीही कानउघडणी केली होती.

ही घटना 11 मे 2023 रोजी घडली होती. कोट्टारक्करा पोलिसांनी संदीप नावाच्या ओरोपीला त्याच्या पायाच्या दुखापतीला ड्रेसिंग करण्यासाठी तालुका रुग्णालयात नेले होते, उपचारावेळी त्याने शल्यचिकित्सक डॉ. दास यांच्यावर टेबलवर पडलेली कात्री आणि चाकूने वार केले, अशा विविध घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन डॉक्टरांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही नियम जारी केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube