मोदींना मणिपूर घटनेचं गांभीर्य नाही, आपल्या भाषणातून खिल्ली उडवली; राहुल गांधींची हल्लाबोल

मोदींना मणिपूर घटनेचं गांभीर्य नाही, आपल्या भाषणातून खिल्ली उडवली; राहुल गांधींची हल्लाबोल

Manipur Violence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत 2 तासापेक्षा अधिक वेळ भाषण केलं. त्यामध्ये शेवटी 2 मिनिटं मणिपूरवर बोलले. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून दंगल, हत्या, महिलांवर अत्याचार, लहान मुलांच्या हत्या होते आहेत. आपण त्यांचं भाषण पाहिले तर ते हसत होते, जोक मारत होते. देशाच्या पंतप्रधांना हे शोभत नाही. लोक मारले जात असताना पंतप्रधांनी मजाक उडवायला नको होता, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर केला.

ते पुढं म्हणाले की अविश्वास प्रस्तावाचा मी विषय नव्हतो, काँग्रेस विषय नव्हता तर विषय मणिपूर विषय होता. मणिपूरमध्ये हिंसाचार का सुरु आहे? हिंसाचार का थांबवता येत नाही? यावर चर्चा होणे अपेक्षित होते. कोणत्याही आपत्तीच्या काळात अनेक राज्यांचा दौरा केला आहे. पण माझ्या 19 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जे मणिपूरमध्ये पाहिले आणि ऐकलं ते भयंकर होतं. मी संसदेत म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. हे मी असेच बोललो नाही. त्यामध्ये खोटे नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

मोठी बातमी! नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

आम्ही जेव्हा मणिपूरला पोहचलो होतो. त्यावेळी मैतैयी भागात गेल्यावर सरळ सांगितले की तुमच्या सुरक्षेत कोणत्याही कुकी व्यक्तीला आणू नका, आणले तर आम्ही त्यांची हत्या करु. त्यानंतर आम्ही जेव्हा कुकी भागात गेलो तर त्यावेळी सांगितले की तुमच्या सुरक्षेत मैतैयी व्यक्ती असेल तर सोबत आणू नका, आम्ही त्यांची हत्या करु, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

‘अमित शाहांच्या खोट्या बोलण्यानं भाजपाचेच नुकसान’; शिंदे गटाच्या नेत्यानेच दिला घरचा आहेर

आम्ही मणिपूरला गेलो तेव्हा कुकी लोकांना बाजूला मैतैयीच्या भागापासून लांब ठेवावे लागले तर मैतैयींना कुकींच्या भागापासून लांब ठेवावे लागले. म्हणजे एक राज्य नाही. आज दोन राज्य झाले आहे. म्हणजे मणिपूरची हत्या केली आहे आणि दोन भागात विभागले आहे. म्हणून मी संसदेत म्हटले की भारत मातेची भाजपाने मणिपूरमध्ये हत्या केली, अशी राहुल गांधी यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube