Mohan Bhagwat : ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतात बेरोजगारी नव्हती, मोहन भागवत यांचा दावा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (8)

भारतात ब्रिटिश राजवटीपूर्वी (British Raj) हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. त्यावेळी देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. रविवारी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की “ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील 70 टक्के लोकसंख्या शिक्षित होती. त्या शिक्षणाच्या जोरावर प्रत्येकजण आपला आपला उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे बेरोजगारी जवळपास नव्हती. पण त्याच वेळी इंग्लंडमध्ये फक्त 17 टक्के लोक शिकलेले होते. ब्रिटिशांनी त्यांचे शैक्षणिक मॉडेल हिंदुस्थानात लागू केले आणि आमचे मॉडेल त्यांच्या देशात लागू केले. अशा प्रकारे ते 70 टक्के साक्षर झाले, आणि आम्ही 17 टक्के शिक्षित झालो”

हेही वाचा : ठाकरे, वायकरांना हिशेब द्यावाच लागणार; सोमय्यांनी थेट पुरावेच मांडले, बडे अधिकारीही गोत्यात

यावेळी बोलताना मोहन भागवत पुढे म्हणाले की, “आपली शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हती तर ती ज्ञानाचे माध्यमही होती. शिक्षण स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला आहे आणि या शिक्षणातून पुढे आलेले विद्वान, कलावंत आणि कारागीर जगभर ओळखले गेले.”

आरोग्य आणि शिक्षण ही आपल्या देशाची सर्वात मोठी गरज

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घघाटनावेळी मोहन भागवत म्हणाले की, “सर्वांसाठी आरोग्य आणि शिक्षण ही आपल्या देशाची सर्वात मोठी गरज आहे, कारण वैद्यकीय सेवा आणि शिक्षण दोन्ही महाग होत आहेत आणि सामान्य माणसाला स्वस्त दरात वैद्यकीय सेवा आणि शिक्षण सुलभतेने मिळण्याची गरज आहे.”

Tags

follow us