Fact Check : कर्नाटकात ‘नंदिनी’, दिल्लीत ‘अमूल’ ! राहुल गांधींच्या ‘त्या’ व्हायरल फोटोत खरं काय ?, जाणून घ्या..
Fact Check : कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Karnataka Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहेत. या निवडणुकीच्या दिवसातच तेथे अमूल विरुद्ध नंदिना असाही एक वाद सुरू आहे. या वादादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामधील एक फोटो राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर केला होता.
या फोटोत राहुल एका नंदिनी स्टोअरवर दिसत आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी लिहीले होते की ‘कर्नाटक की शान, नंदिनी इज द बेस्ट.’
त्यानंतर राहुल गांधी यांचा आणखी एक फोटो शेअर केला जात आहे. या फोटोत राहुल गांधी एका खाद्य पदार्थांच्या दुकानात दिसत आहेत. या फोटोत अमूल दुधाच्या पॅकेटही दिसत आहेत. या फोटोवरून असा दावा केला जात आहे की राहुल गांधी दिल्लीत अमूल दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानात (आउटलेट) गेले होते.
Karnataka’s Pride – NANDINI is the best! pic.twitter.com/Ndez8finup
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 16, 2023
खरे काय, जाणून घ्या
भारतीय जनता पार्टीचे आंध्र प्रदेश सचिव विष्णू वर्धन रेड्डी फोटो शेअर करत दावा केला की राहुल गांधी यांनी कर्नाटकात अमूलच्या विरोधात वक्तव्ये केली आणि नंदिनीचे समर्थन केले. मात्र दिल्लीत ते एका ठिकाणी अमूलच्या डेअरीत गेले. मात्र, भाजप नेत्याने केलेला हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
पहिल्या फोटोत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील नंदिनी स्टोअरचा दौरा केला होता. मात्र, दुसऱ्या फोटोत ते दिल्लीतील एका परिसरातील मोहब्बत की शरबत नावाच्या दुकानात दिसत आहेत. पहिला फोटो राहुल गांधी यांनी 16 एप्रिल रोजी ट्विट केला होता ज्यावेळी ते कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नंदिनी आउटलेटमधून आइस्क्रीम खरेदी केले होते. दुसरा फोटो 18 एप्रिलचा होता ज्यावेळी राहुल गांधी जुन्या दिल्लीत होते. या फोटोत राहुल टरबूज हातात घेतलेले दिसत आहेत.
राज्यपाल असताना का गप्प राहिले; अमित शाहांचा मलिकांवर पलटवार
दावा खोटाच
या फोटोत विक्रेत्याच्या दुकानात अमूल दुधाचे खोके ठेवलेले दिसत आहेत. मात्र ते अमूल आउटलेट नाहीत. राहुल गांधींच्या याच फोटोला शेअर करत दावा केला जात आहे की ते कर्नाटकमध्ये नंदिनी दूध ब्रँडचे समर्थन करतात नंतर दिल्लीत अमूलच्या दुकानातही जातात. हा दावा मात्र खोटा आहे.