पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात का परतली ? पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा
Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan) प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. परंतु, आता इतक्या दिवसांनंतर तिला भारताची आठवण का झाली? अंजू पुन्हा मायदेशात कशासाठी आली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर समोर आलं आहे. अंजूने आपले नाव बदलून फातिमा असं ठेवलं आहे. सध्या ती बीएसएफच्या कँपमध्ये असून विमानाने दिल्लीला जाणार आहे.
अंजूचा पाकिस्तानी पती तिला वाघा बॉर्डरपर्यंत सोडायला आला होता. भारतात आल्यानंतर पोलिसांनी अंजूची चौकशी केली. त्यावेळी अंजूने भारतात येण्याचं कारण सांगितलं. मी थोड्याच दिवसांसाठी भारतात आली आहे. पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पाकिस्तानात परतणार असल्याचे अंजू म्हणाली. इतकेच नाही तर परत जाताना मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जाणार असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.
Seema Haider: सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर बनणार सिनेमा; नाव असेल ‘कराची ते नोएडा’
अंजूचं पाकिस्तानमध्ये जाण्याआधीच लग्न झालं होतं. तिचं लग्न अरविंद नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. पण त्यानंतर ती आपल्या मुलांना आणि पतीला सोडून कागदपत्रं घेऊन पाकिस्तानमध्ये गेली होती. भारतामध्ये अंजू परत आली असली तरी देखील ती कायमची आली आहे की ती पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार? असा प्रश्न होता आता या प्रश्नाचं उत्तर अंजूने स्वतःच दिले आहे.
2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. नसरुल्ला हा पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर त्यांचं बोलणं सुरु झालं. त्यांच्यामध्ये तब्बल दोन वर्ष बोलणं सुरु होतं. त्यानंतर एकमेकांना भेटण्याची इच्छा झाली. मात्र नसरुल्लाने भारतात येण्यास नकार दिला. त्यानंतर अंजूने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी होकार दिला, आणि पासपोर्ट व्हिसा काढून ती टुरिस्ट म्हणून पाकिस्तानमध्ये गेली.
प्रेमासाठी पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली! नसरुल्लासोबत लग्न करुन बनली होती फातिमा