Karnataka CM : .. म्हणून काँग्रेसने सिद्धरामय्यांनाच केले मुख्यमंत्री; शिवकुमारांनाही डावलले

Karnataka CM : .. म्हणून काँग्रेसने सिद्धरामय्यांनाच केले मुख्यमंत्री; शिवकुमारांनाही डावलले

Karnataka New CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या (Siddaramaiah) विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची (Karnataka New CM) शपथ घेतली. डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला डावलून काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यामागे काही खास कारणे आहेत. या कारणांचा विचार करूनच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्यांची निवड केली.

शेतकरी परिवार

मुख्यमंत्री सिद्धरामय्या शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे बालपण गरीबीतच गेले. सिद्धरामय्या कुरुबा समाजाचे आहेत. कर्नाटकात कुरुबा समाज तिसरा मोठा समाज आहे.

1983 मध्ये पहिल्यांदा आमदार

सिद्धरामय्या यांनी 1983 मध्ये लोकदलाच्या तिकीटावर चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी जनता पार्टीची वाट धरली. ते अनेक वेळा मंत्री बनले.

‘आधी पोलीस प्रशासनात दबदबा तर निर्माण करा’; अजितदादांनी टोचले फडणवीसांचे कान

2006 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश

1999 मध्ये जनता दलात फूट पडली त्यानंतर सिद्धरामय्या यांनी जनता दल सेक्युलर पक्षात प्रवेश केला. यानंतर 2004 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र, जेडीएसबरोबरील नाराजीनंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रशासनावर जबरदस्त पकड

सिद्धरामय्या 2013 ते 2018 या काळात काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत. या काळात त्यांनी मोठा जनाधार तयार केला आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे चांगला प्रशासक म्हणूनही पाहिले जाते. या निवडणुकीला त्यांनी आपली शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. या कारणांमुळेच काँग्रेसने यावेळीही त्यांनाच शिवकुमार यांच्यापेक्षा प्रबळ मानले आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

Karnataka CM : राहुल गांधींनी शब्द पाळला; कर्नाटकातील जनतेसाठी ‘सोनिया’चे दिवस

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube