पीएम मोदींनीही केले चिमुकलीचे कौतुक; व्हिडिओ शेअर करत म्हटले…

Mann ki Baat : डिजिटल पेमेंट करा अन् फोटो पाठवा! PM मोदींनी देशवासियांना दिला टास्क

सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक छोटी चिमुकली पियानो वाजवितानाचा हा व्हिडीओ आहे. जो तो या मुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहे. प्रधानमंत्री मोदींनीही (PM Modi) या चिमकुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हा व्हिडीओ सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. असाधारण प्रतिभा आणि क्रिएटिविटी. शाल्मलीला शुभेच्छा.’ असे मोदींनी म्हटले आहे.

हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने शेअर केला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. शेकडो युजर्सवर यावर दिलखुलास प्रतिक्रियाही देत आहेत. या व्हिडिओत एक महिला बॅकग्राउंडमध्ये कन्नड गाणे Pallavagala Pallaviyali गात आहे. या गाण्याच्या चालीवर मुलगी पियानो वाजविताना दिसत आहे.

या मुलीचे नाव शाल्मली असल्याचे सांगण्यात येत आहे. ती स्वतः सुद्धा हे गाणे गुणगुणताना दिसत आहे. शाल्मलीचा मधूर आवाज आणि क्यूट स्माइलने लोकांची मने जिंकून घेतली आहेत. पियानोची चाल लोकांना मंत्रमुग्ध करत आहे. विशेष म्हणजे, शाल्मली फक्त एका हातानेच पियानो वाजवित आहे.

तिच्या या टॅलेंटला प्रधानमंत्री मोदी यांनीही दाद दिली आहे. Pallavagala Pallaviyali हे गाणे कन्नड कवी के. एस. नरसिम्हा यांनी लिहीले आहे. व्हायरल होत असेलल्या व्हिडीओत एक महिला याच गाण्याची कडवे गात आहे. ज्यावर शाल्मली शानदार पद्धतीने पियानो वाजवित आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर ट्विटर युजर्सही दिलखुलास प्रतिक्रिया देत आहेत. या चिमुकलीच्या टॅलेंटचे प्रत्येक जण कौतुक करत आहे. तसेच पीएम मोदींनी या मुलीचे कौतुक केल्याने काही जाणांनी मोदींचेही आभार मानले आहेत.

Tags

follow us