‘जे इंदिरा गांधींसोबर घडलं, ते तुमच्याबरोबरही करू’; खलिस्तानी नेत्याने Amit Shah ना धमकावले..

‘जे इंदिरा गांधींसोबर घडलं, ते तुमच्याबरोबरही करू’; खलिस्तानी नेत्याने Amit Shah ना धमकावले..

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी मिळाली आहे. वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख तथा खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंग याने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. इंदिरा गांधींसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत करू, अशी धमकी त्याने दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

तो म्हणाला, की पंजाबमधील (Punjab) प्रत्येक मुल आज खलिस्तानबाबत बोलत आहे. ज्याला जे काही करायचे आहे ते करून घ्या. आम्ही आमचा हक्क मागतोय.या जमिनीवर आम्ही राज्य केलं. त्यामुळे या जमिनीवर आमचाच हक्क आहे. त्यापासून कुणीही मागे हटणार नाही. मग अमित शहा येवो, नरेंद्र मोदी (Narendra Modi) येवो, अथवा भगवंत मान (Bhagwant Maan) येवो. जगभरातील सैन्य आले तरी आम्ही हा दावा सोडणार नाही.

हे वाचा : मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात…

भाषणात त्याने सरकारलाही गंभीर इशारा दिला आहे. सरकार आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा करत आहे. मात्र, त्यांना हे माहिती असले पाहिजे की आम्ही जत्थासह अटक करून घेतो. आम्ही तुरुंगातही अमृत संचार करू. सरकारने कोणतीही चलाखी करू नये.

अमित शाह यांच्या पत्नी सोनम यांचं माहेरात मराठीतून भाषण, शाळेच्या आठवणी सांगितल्या

या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी डोके वर काढले आहे. या खलिस्तानी (Khalistan) समर्थकांना पाकिस्तानचा (Pakistan) पाठिंबा मिळत असल्याचागही आरोप सातत्याने होत असतो.

https://www.youtube.com/watch?v=P0reSMGjxkQ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube