Nagaland Election Result : नागालँडमध्येही राष्ट्रवादी पुन्हा; 2 विधानसभा मतदार संघात विजय, तर…

Nagaland Election Result : नागालँडमध्येही राष्ट्रवादी पुन्हा; 2 विधानसभा मतदार संघात विजय, तर…

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Result 2023) आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. (Sharad Pawar) त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचं वातावरण आहे. मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का बसण्याची शक्यता आहे. परंतु भाजपने नागालँडची विधानसभा (Nagaland Election Result ) जागा ताब्यात घेतली.

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

भारतीय जनता पक्षाचे पी. बाशांगमोंगबा चांग यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार टोयांग चांग यांच्याशी थेट लढत झाली. भाजपच्या चांग यांनी राष्ट्रवादीच्या तोयांग चांग करे यांचा ५६४४ मतांनी पराभव केला. नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवला आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत.

Kasba Bypoll काँग्रेसच्या धंगेकरांनी ‘ती’ संधी साधलीच!

दरम्यान नागालँडमध्ये राष्ट्रीय संयुक्त पुरोगामी पक्षाला १० जागांवर विजय मिळाला असून एकूण १४ जागांवर आघाडी आहे. भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून ९ जागांवर आघाडी आहे. १ विधानसभा जागेवर होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होती. भारतीय जनता पक्षाने पी. बाशांगमोंगबा चँग यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार टोयांग चांग यांना उमेदवारी दिली. अपक्ष सीएन यांचु चांग (C.N YANCHU CHANG) यांनी ही स्पर्धा त्रिकोणी केली. आता या जागेचा निकाल जाहीर झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube