नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 384 पर्यटक बेपत्ता, 105 भारतीयांची समावेश

Nepal Flood मध्ये आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, 105 भारतीयांसह एकूण 384 पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Nepal Flood

Nepal Flood Massive floods in Bhote Koshi River 384 tourists missing, including 105 Indians : तिबेटच्या सीमावर्ती भागातून आलेल्या पुराच्या पाण्याने नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले आहे. भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, 105 भारतीयांसह एकूण 384 पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रियकरासाठी MPSC चा पेपर फोडला, पण फटका बसला अनेकांना; परीक्षेतील धक्कादायक प्रकार उघड

पुराच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिस्थिती लक्षात घेता नेपाळमधील काही प्रमुख महामार्गांवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, पूरग्रस्त परिसरातून 384 पर्यटक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 291 विदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता विदेशी नागरिकांपैकी 105 जण भारतीय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

8 मृतदेह सापडले, 25 जणांची सुटका

बचाव पथकांनी नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतून आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर 25 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, रसुवा जिल्ह्यात नेपाळ पोलिसांचे 26 जवान आणि सशस्त्र पोलीस दलातील सात जवान बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान

पुराच्या तडाख्यामुळे नेपाळमधील वीज क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. किमान सहा महत्त्वाच्या जलविद्युत आणि वीज पारेषण प्रकल्पांचे नुकसान झाल्याने काही भागांतील वीजपुरवठा प्रभावित झाला आहे.नुकसान झालेल्या प्रकल्पांमध्ये रसुवागढी, चिलिमे, त्रिशुली-3ए, त्रिशुली-3बी हब 220 केव्ही सबस्टेशन, त्रिशुली जलविद्युत केंद्र आणि देवीघाट जलविद्युत केंद्र यांचा समावेश आहे. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाकडून मदतकार्याला वेग देण्यात आला आहे.

follow us