देशाला मिळाली संसदेची नवी इमारत; पंतप्रधान मोदींकडून वीर सावरकरांना आदरांजली
New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी आज रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी इमारतीचे बांधकाम केलेल्या मजुरांचा सत्कारही केला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांना पुष्पांजली अर्पण केली आणि हवन आणि पूजा कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर त्यांनी संसद भवनात सेंगोलची (Sengol)स्थापना केली आणि 20 पंडितांचे आशीर्वाद घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचे उद्घाटन केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांनी सेंट्रल हॉलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली.
New Parliament Building Inauguration : ‘सेंगोल’समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत…
सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून सेंगोल प्रथम पंडित जवाहरलाल नेहरुंना ब्रिटिशांनी सुपूर्द केले. या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसह देशातील प्रमुख व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले होते.
#WATCH | PM Modi unveils the plaque to mark the inauguration of the new Parliament building pic.twitter.com/quaSAS7xq6
— ANI (@ANI) May 28, 2023
केंद्रीय व्हिस्टा प्रकल्पांतर्गत पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. या वास्तूची रचना वास्तुविशारद बिमल पटेल यांनी केली होती आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण झाली आहे. ठरलेल्या वेळेनुसार देशाला संसदेची नवी इमारत मिळाली आहे.
नवीन संसद भवन त्रिकोणी आकारात बांधले गेले असून चार मजले आहेत. 64 हजार 500 स्क्वेअर मीटरमध्ये बांधलेल्या या नवीन संसदेला 3 दरवाजे आहेत. त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत.
लोकशाहीचे प्रतिक असलेले नवीन संसद भवन 862 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाले आहे. नवीन संसद भवनात संविधान सभागृह आहे. त्याचे स्वतःचे महत्त्व आहे. या सभागृहात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, देशाच्या पंतप्रधानांचे मोठे फोटोही सभागृहात लावण्यात आले आहेत.
नवीन संसद भवनात बांधलेल्या संविधान सभागृहाच्या एका बाजूला लोकसभा आणि त्याचे औपचारिक प्रवेशद्वार आहे. सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला राज्यसभा आणि त्याचे औपचारिक प्रवेशद्वार आहे.