NSE चा आयपीओ मालमाल करणार; प्राईस बॅण्ड किती वाढू शकतो ?
NSE IPO-मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड्स एनएसईचा शेअर्स 1,800 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यास उत्सुक आहेत.
NSE IPO : चांगल्या कंपन्यांच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडत असतात. त्याचच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच NSE च्या बहुप्रतिक्षित आयपीओबाबत मोठी अपडेट समोर आलीय. तब्बल 30 हजार कोटींच्या मेगा आयपीओला (IPO) सेबीची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ग्रे मार्केटमध्ये हालचालींना वेग आला. IPO वॉचनुसार, अनलिस्टेड मार्केटमध्ये NSE IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 285 प्रति शेअरपर्यंत पोहोचला आहे.
मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड्स एनएसईचा शेअर्स 1,800 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे कंपनी आपला अधिकृत प्राइस बँड 1,800च्या आसपास निश्चित करू शकते, अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय. 21 सप्टेंबरपासूनच्या आठवड्यात लिस्टिंगची तयारी होणार आहे.मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकींमध्ये NSEच्या शेअरचे 1,800 प्रति शेअर मूल्यांकन स्वीकारले जात असल्याचे दिसून येत आहे. कंपनीकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
IPO पूर्णपणे OFS; NSEला मिळणार नाही एकही रुपया
NSEचा हा देशातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक ठरणार आहे. मात्र, या IPOची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे. विद्यमान भागधारक सुमारे 14.89 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीस काढणार आहेत. हे NSEच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या जवळपास 6 टक्के आहे. IPOची संपूर्ण रक्कम भागधारकांना मिळणार आहे. तर NSEला या इश्यूमधून थेट कोणताही निधी मिळणार नाही.
कोणते मोठे गुंतवणूकदार विकणार NSEमधील हिस्सेदारी?
NSEच्या या OFSमध्ये देश-विदेशातील अनेक मोठ्या बँका, पेन्शन फंड आणि गुंतवणूक कंपन्या आपली हिस्सेदारी विकणार आहेत. यात SBI ग्रुप हा सर्वात मोठा विक्री करणारा भागधारक आहे. तो सुमारे 2.4 कोटी शेअर्स विकणार आहे. तर एमएस स्ट्रॅटेजिक मॉरिशस (MS Strategic): सुमारे1.60 कोटी शेअर्स विक्रीस काढणार आहे. तर कॅनडा पेन्शन प्लॅन सुमारे 1.19 कोटी शेअर्स विकणार आहे. अरंडा इन्व्हेस्टमेंट्स मॉरिशस ही कंपनी सुमारे 1.12 कोटी शेअर्स विक्री करणार आहे. बँक ऑफ बडोदा सुमारे 1.10 कोटी शेअर्स विकणार आहे. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सुमारे 1.09 कोटी शेअर्स विक्रीस काढणार आहे.
GMPमधून काय संकेत?
NSE IPOचा 285 रुपये GMP हा अनलिस्टेड मार्केटमधील सकारात्मक संकेत मानला जातोय. जर ₹1,800चा इश्यू प्राइस आणि ₹285चा GMP कायम राहिला, तर ग्रे मार्केटच्या संकेतांनुसार लिस्टिंगच्या वेळी शेअरची किंमत इश्यू प्राइसपेक्षा लक्षणीयवर राहण्याची शक्यता आहे. मात्र, GMP हा अधिकृत किंवा हमीचा संकेत नसतो आणि प्रत्यक्ष लिस्टिंग किंमत बाजारातील परिस्थितीनुसार बदलू शकते.