रेल्वे अ‍ॅक्सिडेंटनंतर फक्त 35 पैशात मिळतो विमा; जाणून घ्या सविस्तर माहिती

रेल्वे अ‍ॅक्सिडेंटनंतर फक्त 35 पैशात मिळतो विमा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Odisha Train Accident :  2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे एक भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 233 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. अपघातस्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जे जखमी झाले आहेत, त्यांना सरकार आणि रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीकडून किती मदत केली जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे आम्ही त्या रेल्वे प्रवास विमा कंपनीबद्दल बोलत आहोत जी तुम्हाला तिकीट बुक करताना 35 पैशांमध्ये विमा देते.

जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करता तेव्हा तुम्हाला तिकीटासोबत प्रवास विमा घेण्याचा पर्याय देखील मिळतो, ज्याची किंमत फक्त 35 पैसे आहे. ओडिशा बालासोर रेल्वे दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि जखमींना या प्रवास विम्याचा काय फायदा होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जर असतं रेल्वेचं ‘कवच’ तर अपघातच झाला नसता; जाणून घ्या, काय आहे टेक्नॉलॉजी?

जर तुम्ही तिकीट बुक करताना हा प्रवास विमा घेतला असेल, तर अपघातात तुमचा जीव गेल्यावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विमा कंपनीकडून 10 लाख रुपयांची भरपाई मिळते. खरं तर, IRCTC वेबसाइट सांगते की हा प्रवास विमा कलम 123, 124 आणि 124A अंतर्गत रेल्वे अपघातासाठी ठेवण्यात आला आहे आणि त्याची पात्रता रेल्वे कायदा 1989 नुसार निर्धारित करण्यात आली आहे.

रेल्वे तिकीट बुक करताना प्रवास विमा काढलेल्यांच्या नातेवाईकांना प्रवाशाच्या मृत्यूनंतर 10 लाख रुपयांची भरपाई मिळते. त्याचबरोबर अपघातात पूर्णपणे अपंग झालेल्या प्रवाशाला 10 लाख रुपयांची भरपाईही मिळते. तर, अंशतः कायमचे अपंगत्व आल्यास, प्रवाशाला 7.5 लाख रुपयांची भरपाई मिळते. दुसरीकडे, जर तुम्ही रेल्वे अपघातात जखमी झालात, तर तुम्हाला हॉस्पिटलच्या खर्चाच्या नावावर 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाते.

‘6 जून 1981’ रेल्वेच्या इतिहासातील काळा दिवस, भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात

केवळ प्रवास विमा घेऊन तुम्हाला भरपाई मिळणार नाही, यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, त्यानंतरच तुम्हाला या प्रवासी विम्याची भरपाई मिळेल. आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार, आयआरसीटीसीने दिलेली ही सुविधा फक्त ई-तिकीट बुक करणाऱ्यांनाच लागू आहे.
म्हणजेच जेव्हा तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक कराल तेव्हाच तुम्हाला हे मिळेल. दुसरे म्हणजे, एका PNR क्रमांकावरून बुक केलेल्या सर्व तिकिटांसाठी प्रवास विमा घेतला असेल, तर तो सर्व तिकिटांना सारखाच लागू होईल. प्रवास विम्याची ही सुविधा फक्त कन्फर्म, CNF किंवा RAC साठी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube