Video : ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटचा माजी खासदार भृजभूषण सिंहवर गंभीर आरोप; कुस्ती जगतात खळबळ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेशने वरिल दावा केला आहे. विनेशच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
ऑलिम्पिक कुस्तीपटू आणि हरियाणातील (Wrestling) काँग्रेसची आमदार विनेश फोगटने खळबलजनक खुलासा केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर थेट गंभीर आरोप केला आहे. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या सहा पीडितांपैकी मी एक आहे. माझी साक्ष न्यायालयात सुरू आहे असा खुलासा विनेशने केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेशने वरिल दावा केला आहे. विनेशच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘उत्तर प्रदेशातील गोंडात 10 ते 12 मे दरम्यान सिनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धा आयोजित केली जात आहे. आज, काही अडचणींमुळे मला ही गोष्ट सांगावी लागली असंही ती म्हणाली आहे. तसंच, बृजभूषण यांच्या घरी (गोंडा) जाऊन स्पर्धेत भाग घेणं माझ्यासाठी अवघड होईल. मला नाही वाटत की मी माझे 100 टक्के देऊ शकेन असंही ती म्हणाली आहे.
Vinesh Fogat : आत्तापर्यंत करोडोंची ऑफर धुडकावली; विनेश फोगटचं प्रत्युत्तऱ
मी आणि माझा संघ स्पर्धेत भाग घेऊ. जर कोणासोबत काही चुकीचे घडले, तर त्यासाठी भारत सरकार जबाबदार असेल. तीन वर्षांपूर्वी विनेशने ब्रृजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यावरून महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतर येथे ब्रृजभूषण यांच्या विरोधात आंदोलन केले. विनेश या हरियाणातील जुलाना येथील काँग्रेसच्या आमदार आहेत. ब्रृजभूषण हे भाजपचे माजी खासदार आहेत. सध्या त्यांची दोन उत्तर प्रदेशमधून खासदार आणि एक आमदार आहे.
विनेश म्हणाली की, तीन वर्षांपूर्वी आम्ही लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सहा महिला खेळाडूंनी या प्रकरणात तक्रारी दाखल केल्या आहेत आणि साक्ष दिली आहे, आणि साक्षींची प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही पीडितेची ओळख सार्वजनिक करू नये, कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. आज, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगणे भाग पडत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मला आता बोलायचे नव्हते. सत्य देशासमोर उघड होईल. मला तुम्हाला सांगायचे आहे की, तक्रार दाखल करणाऱ्या सहा पीडितांपैकी मी एक आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत विनेश म्हणाली, “नमस्कार सर्वांना. सर्वांना माहीत आहेच की, मी गेल्या दीड वर्षापासून कुस्तीच्या मॅटपासून दूर होते. पण आता, गेल्या काही महिन्यांपासून मी कुस्तीची तयारी करत आहे. मी खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी देशासाठी पदके जिंकली आहेत, त्याचप्रमाणे देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने, मी कुस्तीच्या मॅटवर परत येऊन देशासाठी आणखी अनेक पदके जिंकेन आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवेन अशी आशा आहे.
विनेश पुढे म्हणाली, “मला एका व्हिडिओद्वारे तुम्हा सर्वांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी, कुस्ती महासंघाने एका स्पर्धेची घोषणा केली.” ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित केली जात आहे. तिथेच बृजभूषणचे घर आहे. त्यांचे खासगी महाविद्यालय तिथंच आहे. तिथे मेहनत करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचा हक्क मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.
विनेश म्हणाली की, “कोणाच्या सामन्यात पंचगिरी कोण करणार? प्रत्येक पंच किती गुण देणार? प्रत्येक सामन्याचा अध्यक्ष कुठे बसणार? कोण जिंकणार आणि कोण हरणार? हे सर्व बृजभूषण आणि त्याचे लोक नियंत्रित करतील. सरकार आणि आमचे क्रीडा मंत्रालय हे सर्व मुक प्रेक्षकांप्रमाणे पाहत आहेत.” खेळाडूंना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये, जणू काही हवे ते करण्याची पूर्ण मोकळीक दिली आहे. तो महिला कुस्तीपटूंसोबत काहीही करो किंवा कुस्ती जगतासोबत, आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. सर्व मेहनती खेळाडूंच्या वजनाची योग्य तपासणी केली जाईल. मला वाटत नाही की त्यांच्या मेहनतीचे खरे फळ मॅटवर दिसेल.
🇮🇳🙏 pic.twitter.com/hQrGmMLMrS
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 3, 2026