लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांना हॉटेल मोफत; ऑपरेशन सिंदूरनंतर हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांना हॉटेल मोफत; ऑपरेशन सिंदूरनंतर हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय

Free Hotels For Tourist After Indian Army Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

10 मेपर्यंत राहता येणार मोफत

ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमान कंपन्यांनी त्यांची सेवा 10 मेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका लेहमधील पर्यकांना बसला असून, अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या पर्यटकांसाठी लेहमधील हॉटेल संघटनांनी अडकलेल्या पर्यटकांना लेहमधील हॉटेलमध्ये मोफत राहता येईल असा एकमताने निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाची विमानसेवा 10 मेपर्यंत बंद 

एअर इंडियाने १० मे रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ९ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यासोबतच इंडिगो एअरलाइन्सने १६० देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या वेगवेगळ्या विमान कंपन्यांची २० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

अमृतसर विमानतळ बंद

अमृतसरमधील श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. एडीसीपी-२ सिरीवेनेला, आयपीएस, म्हणाले की त्यांना सर्व उड्डाणे रद्द करण्याचे आणि पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद करण्याचे निर्देश मिळाले आहेत.

कतार एअरवेजने सर्व उड्डाणे रद्द केली

कतार एअरवेजने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअरलाइन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राहील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube