चर्चेतून तोडगा काढा, युद्धाच्या मार्गाने जाणं योग्य नाही; जी7 देशांचं भारत-पाकिस्तानला आवाहन

Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (Sindoor) यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असून गोळीबार केला जात आहे. याशिवाय ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्नही होत आहे. भारताने पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले परतवून लावत पाकिस्तानच्या एअऱबेसवर हल्ला चढवलाय. दरम्यान, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जी७ देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
पाकिस्तानचा भारताच्या २६ लोकेशनवर हला; भारताकडून प्रतिउत्तरात ६ बॅलेस्टिक मिसाईल्स
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपिय संघाचा जी७ देशांमध्ये समावेश आहे. जी७ देशांनी निवेदनात म्हटलं की, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, युएसएच्या जी७ परराष्ट्र मंत्री आणि युरोपिय संघांचे वरिष्ठ प्रतिनिधी पहलगाम हल्ल्याचा निषेध करतो. तसंच भारत आणि पाकिस्तान यांनी जास्ती जास्त संयम बाळगावा असं आवाहन करतो.
नागरिकांच्या सुरक्षेची चिंता
लष्करी कारवाईत होत असलेली वाढ ही देशांमधील स्थैर्याला धोका निर्माण करते. दोन्ही देशांमधील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता वाटते. दोन्ही देशांनी शांततेतून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली पाहिजे असंही जी७ देशांनी म्हटलं. आम्ही दोन्ही देशांना आवाहन करतो की तात्काळ तणाव कमी करावा. त्यांनी शांततेत मार्ग काढण्यासाठी थेट चर्चा करावी. दोन्ही देशांमधील तणाव, संघर्ष यावर आमचं लक्ष आहे. यावर तोडगा निघावा अशी इच्छा जी७ देशांनी व्यक्त केली.
ट्रम्प यांना वाटतं दोन्ही देशातला तणाव कमी व्हावा
अमेरिकेच्या पत्रकार परिषदेत प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांनी भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबत सांगितलं की, अमेरिका दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही देशांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही वाटतं की दोन्ही देशांमधला संघर्ष लवकर कमी व्हावा.