संसदेचे अधिवेशन लहान असले तरी ऐतिहासिक असेल : PM मोदींचं सूचक विधान

  • Written By: Published:
संसदेचे अधिवेशन लहान असले तरी ऐतिहासिक असेल : PM मोदींचं सूचक विधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बोलावलेल्या संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून (दि.17) सुरू होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी हे अधिवेशन लहान असले तरी, ते ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन असल्याचे म्हटले आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. जुन्या वाईट गोष्टी सोडा आणि चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत या असेही मोदी म्हणाले. विशेष अधिवेशनापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. (Parliament Special Session )

मोदींनी बोलावलेले संसदेचे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार असून, उद्यापासून (दि.19) संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार आहे. या अधिवेशनात सरकार 8 विधेयके मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे सरकारकडून विशेष अधिवेशनाचा अजेंडा लपवत असल्याची टीका विरोधकांकडून केला जात आहे.

संसदेचे विशेष अधिवेश सुरू होण्यापूर्वी मोदींनी G-20 मध्ये मिळालेल्या प्रतिसाद आणि त्यातील चर्चेवर भारताला  नेहमीच अभिमान असेल. आफ्रिकन युनियनचे स्थायी सदस्यत्व आणि G-20 मध्ये सर्वानुमते जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा या सर्व गोष्टी भारताचे उज्ज्वल भविष्य दर्शवतात असा विश्वासही मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्यांनी विध्वंस सुरू केला, मोहन भागवत यांचं मोठं विधान

या देशाला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवायचे आहे. त्यामुळे हे विशेष सत्र अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व सर्व खासदारांना जास्तीत जास्त वेळ मिळावा अशी विवंती करतो. आयुष्यात असे काही क्षण असतात जे उत्साहाने आणि आनंदाने भरलेले असतात. त्यामुळे जुन्या वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी नव्या संसदेत घेऊन जा असे मोदी म्हणाले.

चांद्रयान-३ मोहीम भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चांद्रयान-३ मोहीम नवीन प्रेरणास्त्रोत ठरली. चंद्रावरही भारत तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉइंट भारतासाठी प्रेरणा केंद्र बनले आहे.

‘बस प्रवास अन् वीज मोफत’; तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींच्या सहा मोठ्या घोषणा…

संसदेच्या उभारणीत देशवासीयांचा घाम, पैसा आणि मेहनत 

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 75 वर्षांचा प्रवास आठवण्यासाठी, नवीन सभागृहात जाण्यापूर्वी, इतिहासातील या महत्त्वाच्या क्षणातील प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याची संधी आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी माझ्या देशातील जनतेने घाम, मेहनत आणि पैसा खर्च केला होता असे मोदी म्हणाले. नव्या संसदेत जाण्याची भावना भावनिक असल्याचे म्हणत जुन्या वास्तूत अनेक आठवणी असतात असे मोदी म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=JxXgXSTbIxk

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube