Parliment Session : ‘इंडिया’..’इंडिया’..’इंडिया’; मोदींचं भाषण सुरु अन् विरोधकांचा गोंधळ
Parliment Session : संसदेच्या अधिवेशनात विऱोधी पक्षांच्या सदस्यांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देत आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी मागील निवडणुकीत किती राज्यांनी काँग्रेसला नाकारलं हे सांगत असतानाच विरोधी पक्ष(इंडिया)कडून ‘इंडिया..इंडिया..इंडिया’ च्या घोषणा देऊन सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून स्तनपानविषयक जनजागृती; रोटरी सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील जनता काँग्रेसला कंटाळली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी काँग्रेसला नाकारलं आहे. तामिळनाडूसह पश्चिम बंगालमध्ये 1992 मध्ये त्यांना अखेरचा विजय मिळाला होता. तसेच उत्तर प्रदेशात 85 मध्ये काँग्रेस जिंकली पण नंतर नाही. त्रिपुरामध्येही काँग्रेसला 30 वर्षांपूर्वी विजय मिळाला होता, उडीसामध्येही काँग्रेसला जनतेने हेच उत्तर दिलं असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.
‘इंडिया’ म्हणजे अहंकारी गट अन् संधीसाधू; ज्योतिरादित्य सिंधियांनी विरोधकांना खडसावलं…
तसेच देशातील अनेक राज्यांमधून काँग्रेसचे खासदार निवडून येत नाहीत. याचाच अर्थ आता काँग्रेसवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असंही ते म्हणाले आहेत. याचदरम्यान, विरोधकांनी घोषणा देऊन दणाणून सोडला आहे. विरोधकांनी गोंधळ घालताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी काही काळ गोंधळ घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेस अहंकारात बुडाली असून त्यांना जमीनच दिसत नसल्याची खोचक टीका मोदींनी यावेळी केली आहे.