Manipur Violence : संसदेत मोदींनी दिला शब्द! ‘देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सूर्य उगवणार’

Manipur Violence : संसदेत मोदींनी दिला शब्द! ‘देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सूर्य उगवणार’

Manipur Violence : देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सुर्य उगवणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या महिलांना दिला आहे. मणिपूर हिंसाचार आणि महिलांचा विवस्त्र अवस्थेतल्या व्हिडिओवरुन खेद व्यक्त करीत मोदींनी मणिपूरच्या जनतेला विश्वास दिला आहे. संसदेच्या अधिवेशनात या घटनेवरुन विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केलं आहे.

Parliment Session : अविश्वास प्रस्तावावर मोदी बोलत असतानाच विरोधकांकडून सभात्याग

पुढे बोलताना मोदी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर घटनेवरुन पत्राद्वारे सविस्तर चर्चा करु, असं विरोधकांना सांगितलं होतं. विरोधकांनी या चर्चेला सहमती दर्शवली असती तर अनेक गोष्टी सुचवण्याची त्यांना संधी मिळाली असते. पण विरोधकांना चर्चा करण्यास रस नव्हता. अखेर विरोधकांनी या मुद्द्यावरुन अविश्वास प्रस्ताव आणला आहे, मात्र, अमित शाह यांनी मणिपूर घटनेवरुन सविस्तर चर्चा केली आहे. ज्यांच्यात विश्वास नसतो ते ऐकवतात पण ऐकण्याचं धैर्य नसत, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस; तक्रार दाखल करत तुषार गांधींचा आरोप

तसेच मणिपूरच्या घटनेवरुन न्यायालयाचा निर्णय आला आहे. तिथे दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरु आहे. हिंसाचारात अनेक कुटुंबांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महिलांसोबतही गंभीर गुन्हा घडला. हा गुन्हा अक्षम्यच आहे. या घटनेप्रकरणी दोषींना कडक शासन होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन प्रयत्न करीत आहे. संपूर्ण देश आणि संसद मणिपूरच्या महिला, मुलींसोबत आहे,
भविष्यात शांतीचा सुर्य उगवणार असून नव्या आत्मविश्वासाने मणिपूर पुढे चालणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

विरोधकांवर टोलेबाजी :
सभागृहातून मणिपूरच्या लोकांना संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येवर तोडगा काढण्यास वेळ होता पण विरोधकांना राजकारणाशिवाय काही जमत नाही. ज्यांचा विश्वास नसतो ते ऐकवतात पण ऐकण्याचं धैर्य त्यांच्यात नसतं. विरोधक खोटं पसरवा पळून जातात. हा देश यांच्याकडून जास्त अपेक्षा करीत नसल्याचं म्हणत मोदींनी टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube