Petrol Diesel Price : पेट्रोल ₹88.66 तर डिझेल ₹84.56; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : देशात आज तेल विपणन कंपन्यांनी शनिवार (11) जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे - थे ठेवले आहेत.

Petrol Diesel Price

Petrol Diesel Price : देशात आज तेल विपणन कंपन्यांनी शनिवार (11) जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे – थे ठेवले आहेत. आज कोणताही दरांमध्ये बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 तर 95.20 रुपये प्रति लिटर डिझेलचा दर आहे. तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, देशात सर्वात स्वस्त इंधन पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. या शहरात पेट्रोल 88.66 रुपये प्रति लिटर तर 84.56 रुपये प्रति लिटर डिझेलची विक्री होत आहे. देशता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शेवटचा बदल 25 मे रोजी करण्यात आला होता.

पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नाहीत?

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहे मात्र काही दिवसांपूर्वी दोन्ही देशात झालेल्या शांतता करारानंतर जगातील अनेक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. तरीही देशांतर्गत दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. .

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, कंपन्या सध्या अशा तेलावर प्रक्रिया (रिफायनिंग) करत आहेत जे जास्त किमतीला खरेदी केले गेले होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न होण्यामागे हे कारण मानले जाते. तेल कंपन्यांनी मे महिन्यात अवघ्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केली. परिणामी, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 7.5 पर्यंत वाढ झाली.

आजचे पेट्रोलचे दर

नवी दिल्ली – 102.12

कोलकाता – ₹113.51

मुंबई – ₹111.21

चेन्नई – ₹107.94

गुरुग्राम – ₹102.97

नोएडा – ₹101.89

बेंगळुरू – ₹110.44

भारतीय संघात होणार पाचव्या टी 20 साठी 3 मोठे बदल; तिलक वर्मासह 2 स्टार खेळाडू बाहेर?-

आजचे डिझेलचे दर

नवी दिल्ली – ₹95.20

कोलकाता – ₹99.82

मुंबई – ₹97.89

चेन्नई – ₹99.79

 

follow us