जबलपूर घटनेतील ‘तो’ फोटो अन् शेवटच्या श्वासापर्यंत दिसली आईची माया पण फॅक्ट चेकमध्ये आढळलं वेगळच

photo from Jabalpur incident तील एका फोटोने सोशल मीडियावर एक प्रचंड हळहळ पसरली. मात्र फॅक्ट चेक केल्यानंतर हा फोटो एआयने बनवलेला आहे

Untitled Design (1)

photo from Jabalpur incident and mother’s love seen till her last breath, but a fact check revealed something different : जबलपूरमधील नर्मदा नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ३०) निसर्गाच्या कोपाने एक भीषण तांडव घडले. जोरदार वादळ आणि चक्रीवादळामुळे बर्गी धरणाजवळ 31 प्रवाशांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज बुडाले. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, अनेक जण बेपत्ता  होते. मात्र, या दुर्घटनेतील एका फोटोने सोशल मीडियावर एक प्रचंड अशी संवेदनशीलता आणि हळहळ पसरली.

मोठी बातमी! नाशिकमधील ‘TCS’ प्रकरणात निदा खानचा अटकपूर्व जामीन फोटाळला

हा फोटो होता या दुर्घटनेतील बुडालेल्या आईने मुलाला छातीशी कवटाळून पाण्यावर तरंगत आहे. या फोटोला सर्वत्र मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये बर्गी या ठिकाणी झालेल्या क्रूज दुर्घटनेची जोडला जात होतं. मात्र फॅक्ट चेक केल्यानंतर या फोटोचा या घटनेशी संबंध नसून तो एआयने बनवलेला असल्याचं समोर आलं आहे. तसेच जबलपूरचे जिल्हाधिकारी यांनी देखील हा फोटो या घटनेशी संबंधित नसल्याचे ट्विट केलं आहे.

नेमकी घटना काय?

जबलपूरमधील नर्मदा नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ३०) निसर्गाच्या कोपाने एक भीषण तांडव घडले. जोरदार वादळ आणि चक्रीवादळामुळे बर्गी धरणाजवळ 31 प्रवाशांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज बुडाले. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. जबलपूर अपघातातील एका हृदयद्रावक छायाचित्राने सर्वांनाच सुन्न केले आहे. अंगात लाईफ जॅकेट असूनही एका आई आणि तिच्या चिमुरड्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

मराठवाड्यात पाणीटंचाईचं मोठं संकट; 63 गावांची तहान भागवण्यासाठी 106 टँकर

या फोटोमुळे एक मोठा तांत्रिक प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे लाईफ जॅकेट असूनही या माय लेकांचा मृत्यू कसा झाला. तर, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ज्यावेळी क्रूझचा अपघात झाला, त्यावेळी बोटीवरील प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. जेव्हा बोट बुडू लागली, तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचे वाटप सुरू झाले. त्यावेळी क्रूझवरील या आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्याच लाईफ जॅकेटच्या आत घेतले. तज्ज्ञांच्या मते, हीच चूक जीवघेणी ठरली.

 

follow us