अतिक अहमद यांच्या कबरीवर तिरंगा ठेवून काँग्रेस नेता रडला, पक्षातून हाकालपट्टी

अतिक अहमद यांच्या कबरीवर तिरंगा ठेवून काँग्रेस नेता रडला, पक्षातून हाकालपट्टी

Atiq Ahmad Killed: युपीतील प्रयागराज (Prayagraj) येथे माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed Case) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचवेळी या हत्याकांडानंतर राज्यातील भाजप सरकार आणि पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता या प्रकरणावरून आणखी एक वाद सुरू झाला आहे. काँग्रेस कार्यकर्ता राजकुमार सिंह (रज्जू) याने अतिक अहमद याच्या कबरीवर तिरंगा फडकावला आणि त्यानंतर तिथे अतिक अहमद अमर रहेच्या घोषणा दिल्या.

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ता राजकुमार सिंह हा अतिक अहमद याच्या कबरीवर तिरंगा लावताना दिसत आहेत. त्यासोबत तो कलमाचे पठणही करत आहेत. यानंतर राजकुमार हा अतिक अहमद याच्या कबरीजवळ उभा राहून ‘अतीक अहमद अमर रहे’च्या घोषणा देत आहे.

अंबानींना दर महिन्याला मिळणार एवढे पैसे, अ‍ॅपल स्टोअरचे भाडे ऐकून व्हाल थक्क!

राजकुमार सिंह हा अतीक अहमदच्या कबरीजवळ बसून म्हणला की, 1,24,000 पीर बाबा अतीकला न्याय देतील. राजकुमार म्हणतो अतीक अहमद तू अमर आहेस. अतीक अहमद, तू अमर आहेस, अमर राहशील, मी तुला भारतरत्न मिळवून देईन, शहीदांचा सन्मान मिळवून देईन, असे तो म्हणतो. यानंतर राजकुमार याने अश्रफ यांच्या समाधीवरही तिरंगा फडकला आहे. यासोबतच अहमद यांचा मुलगा असद याच्या कबरीवरही अतिकने तिरंगा फडकावला.

नितेश राणे येणार आता अडचणीत ? अॅट्रासिटीचा दाखल करण्याची मागणी

काँग्रेसकडून कारवाई
अतिक अहमद याला भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या रज्जू भैया उर्फ ​​राजकुमार यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रयागराज शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रदीप कुमार मिश्रा ‘अंशुमन’ म्हणाले की, राजकुमार यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यात राजकुमार अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करत होता. यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अतिक आणि अशरफ यांच्या कबरीवर तिरंगा फडकवत आहे.

प्रदीप मिश्रा अंशुमन यांनी सांगितले की, रज्जूने माफिया अतिकवर दिलेल्या वक्तव्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे रज्जू यांचे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने रज्जू यांची नगरसेवकपदाची उमेदवारीही मागे घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube