G -20 : जी-20 परिषदेसाठी आणलेल्या रोपांच्या कुंड्यांची चोरी, व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Published:
Ayant Dharmadhikari (12)

दिल्ली : दिल्लीजवळील गुडगावमध्ये G-20 शिखर परिषद (G-20 Summit) होत आहे. गुडगावमध्ये होत असलेल्या G-20 परिषदेची तयारी बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक प्रशासनाकडून शहराच्या सुशोभिकरणावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराचे सौंदर्य वाढवून परदेशी पाहुण्यांना प्रभावित करण्यासाठी या परिषदेसाठी महानगर पालिकेने शहरात सुशोभीकरणासाठी रस्त्यांच्या कडेला कुंड्यांमध्ये रोपे लावली आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात काही लोक एका कारमधून रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या रोपांच्या कुंड्या चोरून घेऊन नेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ रोपे चोरतानाचा हा व्हिडिओ 1 मिनिट 7 सेकंदाचा आहे. शंकर चौकात एक गाडी थांबल्याचे दिसून येते. त्यातून 2 जण खाली उतरतात. यानंतर त्यांनी चौकात सुशोभीकरणासाठी ठेवलेल्या विशेष प्रकारची रोपे उचलली आणि गाडीमध्ये टाकली. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहराही स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओतील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे चोरटे लाखो रुपये किमतीच्या आलिशान कारमध्ये कुंड्या भरून घेऊन जात आहेत.

भाजपचे हरियाणा प्रवक्ते रमण मलिक (Raman Malik) यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गुरुग्राम पोलिस आणि प्रशासनाव्यतिरिक्त हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाईचे आवाहन केले आहे. मलिक यांनी सांगितले की, हा व्यक्ती 40 लाखांच्या कारमध्ये आला आणि जी-20 परिषदेसाठी आणलेली रोपे चोरत आहे. हा व्हिडिओ शंकर चौकातील आहे. दिवसाढवळ्या झाडांची लूट केली जात आहे. ही बाब प्रचंड लाजीरवाणी असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मलिक यांनी ट्विट केल्यानंतर आता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे संयुक्त सीईओ एसके चहल यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. चहल यांनी सांगितले की, जी-20 कार्यक्रमासाठी लावलेल्या फ्लॉवर पॉट्सची चोरी करणाऱ्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे. आता आरोपी कारचालकाविरुद्ध डीएलएफ फेज 3 पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली, असं त्यांनी सांगितलं आहे.

UPI  विस्तारासाठी RBI प्रयत्नशील, मॉरिशस आणि इंडोनेशियाशी चर्चा सुरू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube