PM मोदी ‘नोबेल’चे प्रबळ दावेदार; रशिया-यूक्रेन युद्धात समितीचे मोठे विधान

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 16T134029.240

Nobel Prize For PM Modi :  रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले होते त्याचे कौतुक नोबेल पारितोषिक देणाऱ्या कमिटीने केले आहे. नोबेल कमिटीचे डिप्टी लीडर एस्ले टोजे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ज्या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपतींना युद्ध थांबवण्यासाठी समजावले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता पण कठोर शब्दात अणु युद्धाच्या परिणामाविषयी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात आम्हाला अशाच नेत्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.

नोबेल कमिटीचे नेते एस्ले टोजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांती पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत, असे ते म्हणाले आहेत. मोदी हे अत्यंत विश्वासपूर्ण नेते आहेत. ते जगभरात शांती प्रस्थापित करु शकतात. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत व त्यांचे शांतीसाठी मोठे योगदान आहे, असे टोजे म्हणाले आहेत.

अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; अरुणाचल प्रदेश भारताचाच…

‘हे युद्धाचे युग नाही’, असे मोदींनी रशियाचे राषट्रपती पुतिन यांना सांगितले होते. या त्यांच्या वक्तव्यावर टोजे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. तसेच टोजे यांनी भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारताचे महाशक्ती बनने हे निश्चित आहे. युद्धाला थांबवण्यासाठी मोदी हे सर्वात विश्वासक नेते आहेत व जगात नक्कीच शांती प्रस्थापित करु शकतात, असे टोजे म्हणाले आहेत.

इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला, आतापर्यंत 9 मृत्यू; महाराष्ट्राचे सर्वाधिक 58 रुग्ण

टोजे पुढे म्हणाले की, मला याचा आनंद आहे की मोदी हे केवल भारताला पुढे घेऊन जाण्याचे काम नाही करत आहेत तर त्या मुद्द्यावर देखील काम करत आहेत, जे जगात शांतीसाठी महत्वपूर्ण आहेत. जगाला भारताकडून शिकण्याची गरज आहे. भारताचे महाशक्ती बनने हे नक्की आहे, अशा शब्दात त्यांनी भारताचे कौतुक केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube