PM Modi : थँक्यू फ्रेंड्स म्हणत PM मोदींनी दुसऱ्यांदा इन्स्टावर पोस्ट केला सेल्फी व्हिडिओ
PM Modi : नीट पेपर फुटी प्रकरणानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले असून पंतप्रधान मोदी यांनी 24 तासांच्या आत दुसऱ्यांदा
PM Modi : नीट पेपर फुटी प्रकरणानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले असून पंतप्रधान मोदी यांनी 24 तासांच्या आत दुसऱ्यांदा इन्स्टाग्रामवर सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय राहण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी या व्हिडिओमध्ये तरुणांनी त्यांच्या पहिल्या व्हिडिओला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीकसंदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी गुरुवारी रात्री एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला होता.
शुक्रवारी रात्री शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, थँक्यू फ्रेंड्स.. काल रात्री मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी पोस्ट केलेल्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आणि ज्या सकारात्मक सूचना केल्या, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. यापुढेही अधिक एक्टिव्हपणे आपला संवाद सुरु राहणार असं या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत सरकारच्या कामांची माहिती पोहचवा असे आवाहन केले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान मोदी यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे इन्स्टाग्रामवर तुम्ही किती सक्रिय राहतात असा प्रश्न विचारला. तसेच इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग एक्टिव्ह असतो. त्यामुळे सरकारनेही या माध्यमातून त्यांच्याशी थेट संपर्क वाढवावा असं या बैठकीत सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे.
PM Shri @narendramodi thanked India’s youth for the response and suggestions following his video and expressed his gratitude for the overwhelming support.
Watch ⬇️ pic.twitter.com/Y2q35aRNdP
— BJP (@BJP4India) July 24, 2026
‘या’ 5 राशींसाठी होणार फायदा; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
तर दुसरीकडे पेपर फुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोज जनता पार्टीसह हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून देखील पाठिंबा मिळाल्याने मोदी सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे मात्र आता स्वत: पंतप्रधान मोदी यांनी या मुद्दावर लक्ष घातल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोराने सुरु आहे.