Narendra Modi : संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता… हादरवणारी अपडेट समोर!
गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
In a first since 2004, Lok Sabha approves President speech without PM’s reply : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव पंतप्रधान मोदींच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदी आज (दि.4) लोकसभेत आभार प्रस्ताव मांडत उत्तर देणार होते. मात्र, लोकसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, मोदींच्या आभारपूर्वी भाषणाशिवाय लोकसभेत प्रस्ताव मंजूर करण्यामागे संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता असा खळबळजनक कारण देण्यात आले आहे. गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.3) राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान झालेल्या गोंधळामुळे आठ विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतरही बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांचा गोंधळ सुरूच राहिला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, पंतप्रधान सायंकाळी ५ वाजता लोकसभेत भाषण करण्यापूर्वी महिला विरोधी खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातला. त्यामुळे मोदींचे आभारपूर्वी उत्तर भाषण आज (दि.5) नियोजित होते. परंतु गोंधळाच्या दरम्यान, सभापती ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला.
24 वर्षांपूर्वी असचं घडलं होतं
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तान न देण्याची ही पहिली वेळ नसून, 24 वर्षांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भाषण देता आले नव्हते. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत फक्त तीन खासदार आपले भाषण पूर्ण करू शकले होते.
राहुल गांधींना लोकसभेत बोलण्यापासून का रोखण्यात आले?
राहुल गांधी लोकसभेत माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन बोलण्याचा प्रयत्न करत होते. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर आक्षेप घेतला. शेवटी, त्यांना त्यावर बोलण्यापासून रोखण्यात आले. काँग्रेसने यावर आक्रमक भूमिका घेतली आणि गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू देणार नाही असा पवित्रा विरोधकांकडून घेण्यात आला होता. अखेर आज (दि.5) लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
