Atiq Ahmed च्या हत्येनंतर प्रयागराजमध्ये पोलिसांवर हल्ला…

Atiq Ahmed च्या हत्येनंतर प्रयागराजमध्ये पोलिसांवर हल्ला…

Atiq Ahmad Murder Case : प्रयागराजमध्ये अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांच्या हत्येनंतर आज रविवारी सकाळी पोलीस (UP Police) टीमवर हल्ला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चकिया परिसरात आज सकाळी पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक (stone throwing)करण्यात आली. माफिया अतिक अहमदचे घर याच भागात असल्याची माहिती आहे. मात्र, हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Atiq Ahmed च्या डोक्यात गोळी मारली कोणी? त्यांना व्हायचंय यूपीचा डॉन

अतिक अहमदच्या हत्येनंतर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यादरम्यान जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, आज सकाळी जिल्ह्यातील चकिया भागात अतिक अहमद यांच्या घराजवळ पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला.

येथे रविवारी सकाळी पोलीस पथकावर संतप्त झालेल्या लोकांनी दगडफेक केली. मात्र, आता या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे उमेश पाल यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अतिक अहमदच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये चोख पोलीसबंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube