इम्रान खानला अटक करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दाखल…

इम्रान खानला अटक करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दाखल…

तोशकाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा लाहोरमधील जमान पार्कमध्ये पोहोचला आहे. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आहे. तसेच दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे पहिले प्रकरण आहे ज्यामध्ये इम्रान खानचे अटक वॉरंट निलंबित करण्यात आलेले नाही. यावेळी पीटीआयच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांचं एक पथक लाहोरमध्ये तैनात करण्यात आलं आहे.

बांगलादेशने इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला दिला क्लीन स्वीप

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन न्यूज’च्या माहितीनूसार इम्रान खान समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. घटनास्थळी दगडफेकही झाल्याचं समोर आलं असून दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तोशकाना प्रकरणात इम्रान खानला अटक करण्यासाठी पोलिस आले असून यावेळी जे इम्रान खान समर्थक दगडफेक करीत आहे त्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे.

Asim Sarode म्हणातात… अपात्र आमदारांचा मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे..!

याआधीही सोमवारी इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशाकाना प्रकरणात माजी पंतप्रधानांचे अजामीनपात्र अटक वॉरंट स्थगित केले. इस्लामाबाद न्यायालयाने यापूर्वी सुनावणीतून सूट मिळावी, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

मागील आठवड्यात, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पीटीआय प्रमुखाच्या वारंवार अनुपस्थितीवरून स्थानिक न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट स्थगित केले.

साई रिसॉर्टप्रकरणी अधिकारीही गोत्यात, तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक

तत्पूर्वी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांच्या निर्णयाविरुद्ध पीटीआय प्रमुखाच्या याचिकेला परवानगी दिली आणि खान यांना 13 मार्च रोजी ट्रायल कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले.

तसेच सोमवारच्या सुनावणीदरम्यान, खान यांनी सुरक्षा धोक्यांचा हवाला देत सूट याचिका दाखल केली आणि पुन्हा एकदा न्यायालयात हजर राहू शकला नाही.

अंबादास दानवे तुम्ही हे काय बोलले? शीतल म्हात्रेंचा तो व्हिडिओ मी फॉरवर्ड केलायं; तो 32 देशांनी पाहिलायं

इम्रान खानची याचिका फेटाळताना, न्यायालयाने पीटीआय प्रमुखाला अटक करण्याचे आणि 18 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश जारी केले आहेत. इम्रान खानला न्यायालयात आणणे पोलिसांचे काम आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
दरम्यान, शहरातील उच्चभ्रू भागात असलेल्या इम्रान खानच्या निवासस्थानाला पोलिस दलाने घेराव घातला असून डीआयजी शहजाद बुखारी हे ऑपरेशन करीत आहेत.

दरम्यान, आम्ही वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला प्रकरणाचा तपशील माहीत आहे, परंतु चर्चा करू शकत नसल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube