बांगलादेशने इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला दिला क्लीन स्वीप

बांगलादेशने इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला दिला क्लीन स्वीप

ढाका : शेर-ए-बांगला (BAN vs ENG) राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेश संघाने (bangladesh Cricket team) 16 धावांनी विजय मिळवला. या सामन्यासह बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला.

बांगलादेशने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 142 धावाच करू शकला.

Old pension : मुख्यमंत्र्यांकडून अभ्यासासाठी समितीची घोषणा, संप मागे घेण्याचे आवाहन

दरम्यान, बांगलादेश संघाने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना 6 विकेटने, तर दुसरा सामना 4 विकेटने जिंकला. 14 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात बांगलादेश संघाने इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 ने जिंकली.

तिसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 20 षटकात 2 गडी गमावून 158 धावा केल्या. बांगलादेश संघाकडून सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक धावा केल्या. 57 चेंडूंचा सामना करत त्याने 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावांची अर्धशतकी खेळी खेळली.

त्याच्याशिवाय नजमुल हुसेन शांतोने 36 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार शकीब अल हसन 6 चेंडूत 4 धावा करून नाबाद राहिला. संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 158 धावा केल्या.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 142 धावांवर गारद झाला. संघाकडून सर्वाधिक धावा डेव्हिड मलानच्या बॅटमधून आल्या. त्याने 47 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याच्याशिवाय कर्णधार बटलरने 31 चेंडूंचा सामना करत 40 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून अहमदने सर्वाधिक 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय तनवीर इस्लाम, कर्णधार शकीब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube