बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव; PK राजकारण सोडण्यावर ठाम
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडलं आहे. निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांची राजकीय पटलावर मोठी चर्चा होती त्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला दारून पराभव वाट्याला आला आहे. (Bihar) एवढंच नाही तर प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या आधी अनेक मोठे दावे केले होते. मात्र, त्यांचे दावे फोल ठरले असून जनसुराज पक्षाला एकही जागा मिळाली नाही. तसंच, मतदानही जास्त प्रमाणात झालं नाही. आज त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या पराभवावर आणि राजकारण सोडण्यावर भाष्य केलं आहे.
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडलं आहे. निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पराभवाची जबाबदारीही स्वीकारली आहे. ‘मी पराभवाची जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो’, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
बिहारमध्ये पुन्हा नितीश राजच; सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली, 20 तारखेला शपथविधीची शक्यता?
आम्ही बिहारच्या सत्तेत बदल घडवून आणू शकलो नाही. मात्र, बिहारचं राजकारण बदलण्यात आम्ही नक्कीच काही महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आमच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही, त्यात काही चूक झाली असेल.जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी ती जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो की मी बिहारच्या लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या लोकांना त्यांनी कोणत्या आधारावर मतदान करावं आणि त्यांनी नवीन व्यवस्था का निर्माण करावी? हे बिहारच्या लोकांना मी समजावून सांगण्यात कमी पडलो. त्यामुळे मी प्रायश्चित्त म्हणून मी २० नोव्हेंबर रोजी गांधी भितिहरवा आश्रमात एक दिवसाचं मौन उपोषण करणार आहे. आमच्याकडून चुका झाल्या असतील, पण आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
