कांग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या, असं पंतप्रधानपद भेटणार का, मोदींचा काँग्रेसवर वार
काँग्रेस नेते भाजप आणि एनडीएचा विरोध करतात. राजकारणात तुम्हाला हेच करायचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ (Modi) मेट्रो आणि नमो भारत सेवांचं उद्घाटन केलं. १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन केलेला ८२ किलोमीटर लांबीचा दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा असणार आहे. यावेळी उद्घाटन समारंभात बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.
एकीकडं देशवासी भारताच्या विकासासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु, देशात असं काही राजकीय पक्ष आहेत जे भारताचे यश पचवू शकत नाहीत. तुम्ही अलीकडंच भारतात होणारी जगातील सर्वात मोठी एआय शिखर परिषद पाहिली. ८० हून अधिक देशांचे प्रतिनिधी दिल्लीत आले होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक दिल्लीत जमले होते.
AI Summit : योग्य दिशेने वाटचाल केली तरच उपाय; AI समिटमध्ये मोदींनी सांगितलं MANAV व्हिजन
महिला खासदारांना पंतप्रधानांच्या जागेवर पाठवून आणि जागा काबीज करून तुम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही. तुम्ही इतके पोकळ झाला आहात का की तुम्ही यासाठी माता आणि बहिणींचा वापर करत आहात? काँग्रेस देशासाठी ओझं बनली आहे. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की, काँग्रेसच्या सर्व मित्रपक्षांनी दिल्लीतील घटनेवर जोरदार टीका करण्याचं धाडस दाखवलं आहे. याबद्दल मी त्यांचं जाहीरपणे आभार मानतो.
काँग्रेस नेते भाजप आणि एनडीएचा विरोध करतात. राजकारणात तुम्हाला हेच करायचं आहे. आम्हाला ते समजते आणि आम्ही ते सहन करू. पण काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवं होतं की एआय ग्लोबल समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता, तो एक राष्ट्रीय कार्यक्रम होता, राष्ट्राचा सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम होता पण काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या असा आरोपही मोदींनी केला आहे.
