Private jet crashes: देशात आणखी एक भीषण विमान अपघात; खासगी विमान झाडाला आदळून डोंगरात कोसळले !

Private jet crashes-जशपूर-नारायणपूर भागातील डोंगरात कोसळलेल्या विमानातून धूर आणि आगीच्या ज्वाला दिसत होत्या.

  • Written By: Published:
Plane Carsh

Private jet crashes: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एक खाजगी विमान डोंगराच्या उतारावर कोसळले आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. यात जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जंगलातील एका झाडाला विमान धडकल्याने ते खाली कोसळले आहेत. यात पायलट आणि सहपायलटचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

जशपूर-नारायणपूर भागातील डोंगरात कोसळलेल्या विमानातून धूर आणि आगीच्या ज्वाला दिसत होत्या. या दुर्दैवी विमानात किती प्रवासी होते हे अद्याप कळलेले नाही. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

प्राथमिक माहितीनुसार पायलट आणि सह-पायलट या दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी विमानात इतर कोणी प्रवासी होते का, याची खात्री सुरू आहे. एसएसपी लाल उमेद सिंग यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ते सध्या अपघातस्थळी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर देखरेख करत आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
प्रशासन या घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करत आहे, तर दुसरीकडे जशपूर जिल्ह्यातील अपघातस्थळावरील विध्वंसाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनास्थळावरील फुटेजमध्ये डोंगराच्या उतारावर कोसळलेल्या विमानातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला वर जाताना दिसत आहेत.

follow us