‘आप’ ला मोठा धक्का! राघव चढ्ढा यांच्यासह सात राज्यसभा खासदार करणार भाजपात प्रवेश

Raghav Chadha : देशातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तीन

Raghav Chadha

Raghav Chadha : देशातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये राघव चढ्ढा यांच्या नावाचा देखील समावेश आहे.  राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा आपला निर्णय जाहीर केला.

राज्यसभेतील पक्षाच्या दहा खासदारांपैकी सात खासदारांनी एकत्रितपणे पक्ष सोडला असून ते भाजपमध्ये विलीन झाले आहेत. राघव चढ्ढा यांच्याव्यतिरिक्त, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी आणि स्वाती मालीवाल यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. ‘आप’साठी सर्वात मोठा धक्का म्हणजे अशोक मित्तल ज्यांची राघव चढ्ढा यांच्या जागी राज्यसभेत उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच बरोबर पक्षाचे संघटन सरचिटणीस आणि सध्या अरविंद केजरीवाल यांचे मुख्य रणनीतीकार असलेले संदीप पाठक यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय हितासाठी काम करत नाही. त्याऐवजी, हा पक्ष आता केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहे असं आरोप या पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढ्ढा यांनी केला.

मी आम आदमी पक्षापासून स्वतःला दूर करत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे. आम्ही केवळ आमची स्वतःची कारकीर्द घडवण्यासाठी राजकारणात आलो नव्हतो. आज आम्ही अशा एका वळणावर उभे आहोत जिथे आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. एकतर आम्ही राजकारण पूर्णपणे सोडून द्यावे, किंवा आमच्या अनुभवाचा वापर करून विधायक राजकारणात सहभागी व्हावे. आम्ही भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. असं देखील राघव चढ्ढा म्हणाले.

32 बवावट खाते अन् कोट्यवधींचे डाव, अशोक खरात प्रकरणात पतसंस्थेचा मॅनेजर अटकेत

follow us