Rahul Gandhi : नीतीशकुमारांना राहुल गांधींचा फोन; दोघांतील चर्चेने नाराजीचं कोडं सुटणार ?
Rahul Gandhi Talks Nitish Kumar : इंडिया आघाडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज (Nitish Kumar) असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नीतीशकुमार यांना फोन केला. दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजवाणी करण्याच्या उद्देशाने दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे. आघाडीत नीतीशकुमार यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. तसेच जागावाटपासंदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
इंडिया आघाडीची चौथी बैठक राजधानी (INDIA Alliance) दिल्लीत पार पडली. 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असा मोठा प्रश्न या बैठकीत होता. सगळ्यांचा नजरा राहुल गांधी आणि नीतीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडे होत्या. पण, ममता बॅनर्जी यांनी टायमिंग साधत मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढं केलं. त्यांच्या या राजकीय डावाने सारेच आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणज खर्गे यांच्या नावाला आम आदमी पार्टीनेही समर्थन दिले. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचा हा प्रस्ताव म्हणजे नीतीशकुमार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. यानंतर नीतीशकुमार जास्त नाराज झाल्याची चर्चा राजकारणात सुरू होती. मात्र, नीतीशकुमार यांनीच आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT
या बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की मी हा प्रस्ताव ठेवला कारण लोकांकडून इंडिया आघाडीचा पीएम पदाचा उमेदवार कोण असा सवाल सातत्याने केला जात होता. नीतीशकुमार नाराज असल्याच्या चर्चांवर मात्र मला माहिती नाही असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली होती. त्यानंतर नीतीशकुमार नाराज असल्याच्या चर्चा जेडीयूनेही फेटाळल्या होत्या. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह म्हणाले होते, की बैठकीच्या शेवटपर्यंत नीतीशकुमार हजर होते. बैठकीत ठरले होते की एक दोन लोकांनीच मीडियाला माहिती द्यायची मग असे असले तर यात नाराजीचा प्रश्नच येतो कुठे असे ललन सिंगे म्हणाले.
मी अन् नीतीशकुमार नाराज नाही – लालू यादव
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही या चर्चा नाकारल्या होत्या. आम्ही काही जरी ठरवलं तरी लोक उलटेच सांगत राहतात. सगळेच लोक पत्रकार परिषदेत येत नसतात. जागावाटप लवकरच करावे लागणार आहे. मी आणि नीतीशकुमार आजिबात नाराज नाही, असे लालू प्रसाद यादव यांनीही ठासून सांगितले होते.