Rahul Gandhi : मोठी बातमी, राहुल गांधींना पुन्हा पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा राहुल गांधी आंदोलन करत आहे.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा राहुल गांधी आंदोलन करत आहे.  राहुल गांधी यांनी आज आंदोलनाची सुरुवात करताच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. काल (6 ऑक्टोबर) रोजी देखील राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, माझ्यावर 45 एफआयआर दाखल झाले आहेत. माझे लक्ष्य 100 चे आहे. माझ्यावर 100 एफआयआर दाखल व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आपल्यावर दाखल झालेला प्रत्येक एफआयआर हा पदकासारखा आहे. तर आकाशवाणी भवनाच्या आवारात प्रवेश करून तिथे आठ तास धरणे आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर (FIR) प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला हवे तितके गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाही.

6 ऑक्टोबरला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी मोर्चा अडवत नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देत आंदोलन सुरु ठेवलं होतं. या आंदोलनात इतर विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

राहुल गांधींचा पुन्हा एल्गार; जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन आरपारच्या लढाईचा इशारा

तर दुसरीकडे जेव्हापर्यंत ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) राजीनामा देणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याची प्रतिक्रिया देखील माध्यमांशी बोलताना काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.

follow us