Rajasthan Congress : राजस्थानातही काँग्रेसचा ‘छत्तीसगड पॅटर्न’; पायलटांना मिळणार गुडन्यूज?

Rajasthan Congress : राजस्थानातही काँग्रेसचा ‘छत्तीसगड पॅटर्न’; पायलटांना मिळणार गुडन्यूज?

Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजस्थानच्या राजकारणात (Rajasthan Politics) हालचाली वाढल्या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) अंतर्गत वाढलेली धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने भन्नाट प्लॅन तयार केला त्याच पद्धतीने राजस्थानसाठीही प्लॅन तयार केला जाऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. मात्र, या घडामोडींवर पायलट यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दुसरीकडे समर्थकांच्या भेटीगाठी त्यांनी सुरुच ठेवल्या आहेत. यावरून त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पायलट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सचिन पायलट यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार इंद्राज गुर्जर यांनी एक ट्विट केले होते. गुड न्यूज लवकरच मिळणार, कृपया संयम बाळगा अशा आशयाचे ते ट्विट होते. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करून टाकले.

Gujarat Riots : सुप्रीम कोर्टाचाही तीस्ता सेटलवाड यांना दणका; प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे

राजस्थानच्या राजकारणात सध्या या गोष्टीची चर्चा आहे की ज्या पद्धतीने छत्तीसगडमधील नाराज काँग्रेस नेते टी. एस. सिंहदेव यांना उपमुख्यमंत्री बनवून त्यांची नाराजी दूर करण्यात आली त्याच पद्धतीने पायलट यांनाही राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान केले जाऊ शकते.

छत्तीसगडमध्येही वाद पेटलेलाच

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद अजूनही कायम आहे. तसाच वाद छत्तीसगडमध्येही आहे. 2018 मध्ये काँग्रेसने राज्याचा कारभार हाती घेतल्यापासूनच टी. एस. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यातील वाद सुरू आहे. ऑगस्ट 2021 मध्ये देव यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला होता. त्यांनी सांगितले होते की अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेसच्या 70 मधील 55 आमदारांचा पाठिंबा दाखवून बघेल यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवली होती. त्यानंतर गांधी कुटुंबियांनी यामध्ये हस्तक्षेप करत वाद शांत केला होता.

UCC Issue: मेघालयच्या मुख्यमंत्र्याचा समान नागरी कायद्याला विरोध, म्हणाले… हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात

हालचाली वाढल्या, कुणाला मिळणार गुडन्यूज ?

देव यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर गुरुवारी पायलट यांच्या भूमिकेबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चा सुरू झाली. एक दिवस आधी काँग्रेसचे आमदार आणि राजस्थान काँग्रेस प्रमुख गोविंद सिंह डोटासरा यांनी दिल्लीत जाऊन पक्ष नेतृत्वाची भेट घेतली.

पायलट समर्थकांचे म्हणणे आहे की अशोक गेहलोत यांच्याविरोधात 2020 मधील विद्रोहानंतर काँग्रेसने पायलट यांना जी आश्वासने दिली होती ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यावेळी गेहलोत यांनी बहुतांश आमदारांना स्वतःच्या गटात घेत पायलट यांचा विद्रोह मोडीत काढला होता. त्यानंतर या दोन्ही दिग्गज काँग्रेस नेत्यात वाद सुरू आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube