बुवा बाबांवर भाजप-काँग्रेस मेहेरबान, राजस्थानमध्ये अनेक महंतांना उमेदवारी

बुवा बाबांवर भाजप-काँग्रेस मेहेरबान, राजस्थानमध्ये अनेक महंतांना उमेदवारी

Rajasthan Election 2023: भारतीय राजकारणात अनेक शतकांपासून ऋषी-मुनींचा प्रभाव दिसून आला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक बुवा-बाबा आमदार-खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. सद्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Election 2023) भाजपने चार संत तर काँग्रेसने एक संत आणि एका संताच्या सुनेला तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून आणखी दोन संत, भजन गायक प्रकाश माळी आणि साध्वी अनादी सरस्वती यांनाही उमेदवारी मिळू शकते.जाणून घेऊया राजकारणात नशीब आजमावणाऱ्या या संतांबद्दल…

बाल मुकुंद आचार्य: भाजपने बाल मुकुंद आचार्य यांना जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ते जयपूरच्या हाथोज धामचे महंत आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेक आंदोलने झाली. धार्मिक कार्ड खेळत भाजपने प्रथमच बाल मुकुंद आचार्य यांना उमेदवारी दिली आहे.

बाबा बालकनाथ : अलवरच्या तिजारा विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबा बालकनाथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाबा बालकनाथ हे नाथ संप्रदायाचे महंत आहेत. हरियाणातील रोहतक येथील मस्तनाथ मठाचे ते मुख्य मठाधिपती आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत बालकनाथ अलवरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. आता ते विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत.

युपी पोलीसांनी पछाडले जंग-जंग, पण Elvish Yadav ने व्हीडिओद्वारे…

प्रतापपुरी महाराज: जैसलमेरच्या पोकरण विधानसभा मतदारसंघातून भाजपने प्रताप पुरीजी महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने त्यांना मागील निवडणुकीतही लढण्याची संधी दिली होती, परंतु ते काँग्रेसच्या सालेह मोहम्मद यांच्याकडून अवघ्या 872 मतांनी पराभूत झाले. यावेळी पक्षाने त्यांना आणखी एक संधी दिली आहे.

ओताराम देवासी: भाजपने सिरोही विधानसभा मतदारसंघातून ओताराम देवासी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2013 ते 2018 या काळात ते भाजपचे आमदार आणि राजे यांच्या कार्यकाळात मंत्रीही होते. देवासी हे यापूर्वी पोलिसात हवालदार होते. नंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि चामुंडा मातेचे भक्त बनले. ते मुंदरा माता मंदिराचे महंत आहेत.

Elvish Yadav : .. तर मुक्काम थेट तुरुंगातच! काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा?

सालेह मोहम्मद: काँग्रेसने पुन्हा सालेह मोहम्मद यांना पोखरण मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. सालेह मोहम्मद हे मुस्लिम समाजाचा धर्मगुरू गाझी फकीर यांचा मुलगा आहेत. गाझी फकीर यांच्या मृत्यूनंतर सालेह मोहम्मद यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

डॉ. अर्चना शर्मा: काँग्रेसने डॉ. अर्चना शर्मा यांना जयपूरच्या मालवीय नगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. डॉ. अर्चना शर्मा या संत धर्मेंद्र आचार्य यांच्या सून आहेत. त्यांनी रामजन्मभूमी चळवळीचे नेतृत्व केले होते. जयपूरच्या विराटनगरमध्ये त्यांचा मठ आहे. आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सोमेंद्र शर्मा त्यांचे उत्तराधिकारी झाले. सोमेंद्र शर्मा हे काँग्रेस उमेदवार डॉ. अर्चना शर्मा यांचे पती आहेत. डॉ.शर्मा दोन वेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. काँग्रेसने त्यांना आणखी एक संधी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube