मोठी बातमी! राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा

मोठी बातमी! राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा

Jagdeep Dhankhar resigns from the post of Vice President : देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. माझ्या कार्यकाळात आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. असं राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले.

मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठबळ अमूल्य राहिले आहे आणि मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो आहे. संसदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला कळकळ, विश्वास आणि प्रेम माझ्या कायम स्मरणात राहील. या प्रतिष्ठित पदाचा निरोप घेताना, मला भारताच्या जागतिक उदयाचा आणि अभूतपूर्व कामगिरीचा अभिमान वाटतो आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास आहे. असं देखील या पत्रात जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी तीन वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube