स्वस्त कर्जाच्या आशेवर पाणी! रेपो रेट जैसे थे राहणार, RBI ची कडून घोषणा
RBI Keeps Repo Rate Unchanged In Third Straight Policy Meeting : एकीकडे सर्वसामान्यांचे महागाईमुळे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले असताना, यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरबीआयकडून रेपोरेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, सध्याचा रेपा रेट 6.5 टक्क्यांवरच राहणार आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केले आहे. यामुळे कर्जदारांचे EMI जैसे थे राहणार असून, आर्थिक बोजा पडणार नाहीये. एमपीसीच्या बैठकीनंतर दास यांनी ही घोषणा केली आहे.
‘होय, मोदी जे बोलले ते 100 टक्के सत्यच’; शिंदे गटाच्या नेत्यानं फोडलं मोठं गुपित
दास म्हणाले की, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे कर्जदारांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. मात्र, या निर्णयामुळे बँकांकडून स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे.
RBI keeps repo rate unchanged in third straight policy meeting
Read @ANI Story | https://t.co/wzbclSgaDC#RepoRate #RBI #MPC #MonetaryPolicy #ShaktikantaDas pic.twitter.com/7VcpJNRFVI
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2023
आरबीआयचे लक्ष महागाई कमी करण्यावर असून, देशाची आर्थिकस्थिती मजबूत स्थितीत आहे. महागाईचा रेट आरबीआयच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असला तरी, ती कमी करण्यास आरबीआय कटीबद्ध असल्याचे दास यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळाच महागाईचा दर वाढण्याची शक्यताही दास यांनी यावेळी व्यक्त केली.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
2023-24 या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर 5.4 टक्के असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हा दर गेल्या वेळी 5.1 टक्के इतका ठेवण्यात आला होता. अन्नधान्याची चलनवाढ हा चिंतेचा विषय असला तरी, महागाई नियंत्रणात भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय प्रगती केल्याचेही दास यांनी यावेळी सांगितले. आर्थिक वर्ष 2024 मध्ये किरकोळ महागाई दर 5.1 टक्क्यांवरून वाढून 5.4 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला.