तिकिट वाटपावरुन भाजप कार्यालयात राडा, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की
Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या जबलपूर विभागीय कार्यालयात तिकिट वाटपावरुन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.
तसेच त्यांच्यासोबत असलेल्या बॉडीगार्ड जवानाला मारहाण केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णू शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली. मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले. भाजप कार्यालयात झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज भाजपने आपली पाचवी यादी जाहीर केली, ज्यामध्ये जबलपूरच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून अभिलाष पांडे यांना उमेदवारी देण्यात आली. माजी मंत्री शरद जैन पक्षात परतलेले आहेत त्यानंतर संतप्त समर्थक नेते धीरज पटेरिया आणि नगरसेवक कमलेश अग्रवाल यांनी भाजपच्या विभागीय बैठकीत बळजबरीने प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
SA vs ENG : गतविजेता इंग्लंड तोंडावर आपटला ! दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
गोंधळ तासभर चालला
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे तासभर भाजपच्या विभागीय कार्यालयात गोंधळ सुरू होता. या काळात चांगलेच गैरवर्तन झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की करून खाली पाडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Navratri 2023 : गरबा खेळणं पडल महागात; गुजरातमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Breaking
Media Exposes BJP's Internal Issues and harsh language among members in front of their national leader Bhupendra Yadav.pic.twitter.com/k7TuSnteLG
— Venisha G Kiba (@KibaVenisha) October 21, 2023
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, आपण संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहेत. आपल्या गार्डसोबत हाणामारी झाल्याचाही त्यांनी इन्कार केला. त्याचवेळी नाराज कार्यकर्ता मनीष जैन यांनी या जागेवरून पक्षाने उमेदवार न बदलल्यास आम्ही निवडणुकीत काम करणार नाही, असे सांगितले.