सीमा हैदर आठवले गटात प्रवेश करणार? चर्चांमध्ये पक्षाकडून स्पष्टीकरण
Seema Haider Join RPI Party : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत अनेक प्रकारच्या बातम्या ट्रेंड होत आहेत. काही दिवसांपूर्वी सीमाला भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर असल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर आता सीमा हैदर भारतीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (RPI) ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर आता या सर्व चर्चांमध्ये पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
रणपिसे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किशोर मासूम यांचा आपल्याला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी सीमा हैदरला आठवले साहेब पक्षात घेतील का? असा प्रश्न विचारला असता आठवले साहेबांच्या पक्षात सर्व जाती धर्मातील नागरिकांना प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. परंतु, सध्या सीमा हैदर यांची भारतात चुकीच्या पद्धतीने प्रवेश केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
भविष्यात जर, सीमाला भारत सरकारने या सर्व प्रकरणात निर्दोष जाहीर केले. तसेच तिला भारतीय नागरिक म्हणून स्वीकरले तर, सीमाच्या पक्ष प्रवेशाबाबत विचार केला जाऊ शकतो असे स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत आम्हाला किंवा आमच्या पक्षाला कोणत्याही वादात पडायचे नसल्याचेही रणपिसे यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत किशोर मासूम
किशोर मासूम हे राबुपुराजवळ असलेल्या जेवर गावातील दयानतपूर गावचे रहिवासी असून, सध्या ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. इटलीतून भारतात आल्यानंतर सोनिया गांधी भारतीय राजकारण काम करू शकतात तर, अशा परिस्थितीत पाकिस्तानची सीमा हैदर भारतीय राजकारणात का येऊ शकत नाहीत? असे मत किशोर मासून यांनी व्यक्त केले आहे. सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व मिळाले आणि त्यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झाले नाहीत, तर अशा परिस्थितीत सीमा हैदरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्ष बनवले जाऊ शकते.
संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…
सीमा निवडणूक लढवू शकते का?
भारतातील निवडणूक लढवण्याचे पहिले प्राधान्य म्हणजे उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देशातील कोणत्याही राज्याच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. सध्या सीमा हैदर भारतीय नागरिक नाही. त्यामुळे सध्या तरी सुरू असलेल्या चर्चांमध्ये सीमाला निवडणुकीच्या रिंगणात उतरणे शक्य नाही.