Maharashtra Politics : मोदींचा फोन ते पटेलांना 10 तारीख; पडद्यामागचा खेळ पवारांचा तर नाही?
Sharad Pawar Politcs राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही... आणि जेव्हा खेळ पवारांचा असतो, तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचते
Sharad Pawar Politics : राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही… आणि जेव्हा खेळ शरद पवारांचा असतो, तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचते.. पंतप्रधान मोदींचा फोन, अमित शाहांची दिल्लीतील बैठक आणि रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या पवारांची प्रफुल पटेलांनी घेतलेली भेट, या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पण या सगळ्यामागे पडद्यामागची खरी पटकथा नेमकी कोण लिहितंय? हा आता सर्वात मोठा सवाल आहे.
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली. मोदींनी पवारांना म्हटलं की, ‘तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, मी आणि सुप्रिया देश सांभाळू’ त्यावर पवारांनीही उत्तर दिलं, ‘होय, मी विश्रांती घेतोय. आपण सगळे असल्यानंतर मला देशाची चिंता नाही’ पण थांबा… मोदी आणि पवारांमधलं हे खासगी संभाषण बाहेर कसं आलं? पवारांचे जुने मित्र विठ्ठल मणियार यांनी मीडियासमोर हा सगळा संवाद अगदी खात्रीने सांगितला. आता प्रश्न असा पडतो की, मोदी आणि पवारांच्या फोनवरील या संभाषणाची ही इनसाईड डीटेल विठ्ठल मणियारोंना कशी कळली? पवारांनीच ठरवून ही माहिती बाहेर पोहोचवायला सांगितली होती का?
या फोननंतर दुसरी मोठी घटना घडली. दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक घेऊन आलेले प्रफुल पटेल थेट पवारांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले. या भेटीत पवारांनी एकच वाक्य म्हटलं ‘आपण 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू!’ विशेष म्हणजे, या संपूर्ण भेटीतला हाच नेमका भाग कॅमेऱ्यात कैद होतो आणि बाहेर येतो. त्यामुळे प्रश्न हा आहे की, पटेल यांच्या भेटीचा हा व्हिडिओ आणि ’10 तारखेचा’ तो संदेश अगदी परफेक्ट मोजक्या शब्दांत बाहेर कसा आला? हा सर्व काही योगायोग होता, की राजकीय संदेश देण्यासाठी स्वतः पवारांनीच आखलेला हा एक ‘मास्टरप्लॅन’ होता? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. कारण, पवारसाहेबांचा आजवरचा राजकीय इतिहास पाहता, ते विनाकारण एक शब्दही बोलत नाहीत आणि कोणतीही भेट नकळत होत नाही. मोदींचा फोन असो, त्यातून बाहेर आलेली चर्चा असो, किंवा प्रफुल पटेलांसमोर आलेली ’10 तारीख’ असो या प्रत्येक घटनेमागे एक राजकीय रणनीती असू शकते.
Pune Graduate Election Result : वडिलांना आमदार होता आलं नाही पण, पवारांनी लेकीला आमदार केलं…
शरद पवार हे भारतीय राजकारणातील असे नेते मानले जातात, ज्यांच्या मनाचा थांगपत्ता लावणे विरोधक असो वा मित्र, कोणालाही जमलेले नाही. पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी अनेकदा बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय भूमिका घेतली आहे. शरद पवारांचे राजकारण समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीकडे पाहावे लागेल. 1978 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होऊन पुलोद सरकारची स्थापना केली, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती आणि 2019 मधील महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडी, या घटनांनी पवारांच्या राजकीय रणनीतीची वेगवेगळी रूपे दाखवली आहेत. राजकीय मतभेद टोकाचे असले तरी वैयक्तिक संबंध आणि संवादाचे दरवाजे खुले ठेवण्याचा हा पवारांचा जुनाच अंदाज आहे. Sharad Pawar Maharashtra Politics
शरद पवारांच्या 50 वर्षांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास केला, तर असे प्रसंग नवे नाहीत. पवार साहेबांच्या राजकारणाचा पॅटर्न बघितला तर, वैचारिक मतभेद टोकाचे असले तरी राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी वैयक्तिक संबंध आणि संवाद कसा ठेवायचा, हे पवारांना उत्तम जमते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही अशाच अनेक भेटीगाठी आणि विधानांमधून महाराष्ट्राने राजकीय भूकंप अनुभवला होता. त्यामुळे 10 तारखेनंतर काय होईल? याबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
पवारांनी यापूर्वी विलीनीकरणाबाबत काय सांगितले होते?
पवारांनी दिलेल्या तारखेवरून एकीकडे वेगवेगळे तर्क बांधले जात असले तरी, या सगळ्यात शरद पवारांची यापूर्वीची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवारांनी यापूर्वी स्पष्ट भूमिका मांडली होती. ती म्हणजे आपला पक्ष कुठेही जाणार नसल्याची ठाम भूमिका. एवढेच नव्हे तर, ज्यांना आपल्यासोबत यायचे आहे त्यांचे स्वागत असल्याची भूमिकाही पवारांनी मांडली होती. त्यामुळे आता प्रफुल पटेल यांच्यासोबतच्या चर्चेत ते आपल्या भूमिकेत बदल करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे पवार- पटेल यांच्या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. डॉक्टरांनी शरद पवारांना जास्त बोलू नका, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी प्रफुल पटेल यांना 10 तारखेनंतर भेटून चर्चा करू, असे सांगितले असावे असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या भेटीवेळी राजकीय चर्चा झाली असावी असे वाटत नाही असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
पण, एकूण सध्या समोर आलेल्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, पवारांच्या राजकारणात एखाद्या भेटीपेक्षा त्या भेटीनंतर निर्माण होणाऱ्या शक्यतांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे विरोधी पक्षांना आणि स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना एकाच वेळी संभ्रमात ठेवण्याची ही पवारांची नवी चाल आहे का? दोन्ही गट खरोखर एकत्र येणार की, हा केवळ राजकीय दबावाचा आणि संवादाचे दारे खुले ठेवण्याची पवारांची नवी खेळी आहे? हे 10 तारेखे च्या पवार आणि पटेल यांच्या भेटीनंतरच अधिक स्पष्ट होणार आहे. आता पवार-पटेल संवादाने राजकीय चर्चेचे दार नक्कीच उघडले आहे. या दारातून विलीनीकरणाचा मार्ग निघतो, राजकीय समन्वयाचा पर्याय पुढे येतो की दोन्ही गटांमधील अंतर कायम राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Sharad Pawar family friend Vitthal Maniyar says, “His health is very good; there are no serious issues. Two days ago, he had a cough and some congestion, for which he was admitted here. He is always very mindful of his health, so he came in for a check-up. All the test reports came back positive—there was nothing concerning in them at all. He required some treatment for those two issues, and more importantly, he needed some rest. He stayed in the hospital for that rest and was actually planning to leave yesterday. However, we all requested that he stay one more day under the doctor’s supervision. He left for Mumbai this morning. He is just experiencing a bit of weakness, which will resolve once he has had some food. Soon, you will see him back among us, just as he always was…”
— ANI (@ANI) November 4, 2026