नफाखोरीमुळे शेअर बाजार कोसळला! गुंतवणुकदारांना साडेसात लाख कोटींचा फटका

नफाखोरीमुळे शेअर बाजार कोसळला! गुंतवणुकदारांना साडेसात लाख कोटींचा फटका

Share Market : भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी (Investors)अत्यंत निराशाजनक असल्याचा पाहायला मिळाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी काळा दिवस ठरला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्येही जोरदार विक्री दिसून आली. ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स(Sensex) 523 अंकांनी घसरुन 71 हजार 72 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी(Nifty) 166 अंकांच्या घसरणीसह 21 हजार 616 अंकांवर बंद झाला.

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या टाइमलेस टेल ऑफ रोमान्स Fitoor आठ वर्षे पूर्ण, आजही आठवतंय…

शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजारात BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 378.85 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.

राम शिंदेंच्या हाकेला मंत्री विखेंची साथ, आवर्तनाबाबत प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

ते मागील आठवड्यात अर्थात गेल्या ट्रेडिंग सत्रात 386.43 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात बाजाराच्या बाजारमूल्यात 7.58 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. याचाच अर्थ आज गुंतवणुकदारांना तब्बल 7.58 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये त्सुनामी दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप निर्देशांक 1213 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 652 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर बीएसई मिड कॅप 1038 अंकांच्या घसरणीसह आणि बीएसई स्मॉल कॅप 1443 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

त्याचबरोबर बँकींग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टी बँक निर्देशांक 752 अंकांनी घसरला आहे. तो 44 हजार 882 अंकांवर बंद झाला आहे. निफ्टी पीएसयू निर्देशांक 308 टक्क्यांनी घसरला आहे.

याशिवाय एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल आणि गॅस सेक्टर्सचे शेअर्स घसरले. केवळ हेल्थकेअर, फार्मा आणि आयटी समभागात तेजी राहिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज