राम शिंदेंच्या हाकेला मंत्री विखेंची साथ, आवर्तनाबाबत प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

राम शिंदेंच्या हाकेला मंत्री विखेंची साथ, आवर्तनाबाबत प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

Ram Shinde : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून (Sina Dam)आवर्तन सोडावे, यासाठी आक्रमक झालेल्या आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या मागणीला आज (दि.12) मोठे यश आले आहे. जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा मांडला. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patilश्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे घेताहेत तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न, थोरातांची विखेंवर टीका)यांनी तत्काळ सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच…

आज (दि.12) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार राम शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, सीना धरणात पाणी शिल्लक असतानाही कार्यकारी अभियंता देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले.

‘चव्हाणांच्या राजीनाम्याचा मविआवर विशेष परिणाम…’; प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

जनतेसह शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान केले. शासनाच्या विरोधात चीड निर्माण होईल असे, कृत्य केल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित करत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार राम शिंदे यांनी सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सीना धरणातून आजच्या आज पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान शिंदे यांच्या हाकेला मंत्री विखे यांनी तात्काळ हाक दिल्याने शेतकऱ्यांचे प्रश्नी तात्काळ मार्गी लागले.

दरम्यान, टंचाई आढावा बैठकीनंतर आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, सीना डॅम , निमगाव गांगर्डा (ता.कर्जत) मधून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आजच्या आज पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे.

आज आवर्तन सोडण्यात येणार आहे.तसेच आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिशाभूल केली व खोटी उत्तरे दिली. पाणी शिल्लक असून देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले व शेतकऱ्यांचे नुकसान केले शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केले, म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज