अखेर शहजाद पूनावालांची भाजपाला सोडचिठ्ठी; एक्सवर भल मोठं पत्र लिहित दिला राजीनामा

Shehzad Poonawalla यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून, तो स्वीकारण्याची विनंती केली आहे.

Shehzad Poonawalla

Shehzad Poonawalla finally resigns BJP statement citing certain events and people reasons that decision : भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून, तो स्वीकारण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान गेल्या वेळी देखील त्यांनी आपला राजीनामा दिला होता मात्र तो भाजपकडून स्विकारण्यात आला नव्हता. यावेळी पुन्हा त्यांनी आपला राजीनामा देत एक्स पोस्ट केली आहे.

पूनावाला यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे राजीनामा दिला असून, तो स्वीकारावा अशी विनंती केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या प्रोफाइलमध्ये बदल केला होता. त्यांच्या बायोमधून ‘भाजप’चा उल्लेख हटवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पक्षत्यागाबाबत चर्चा सुरू झाली होती. आता स्वतः पूनावाला यांनी राजीनाम्याची अधिकृतपणे माहिती दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

कृपया माझ्या 30 जुलै 2026 रोजीच्या पत्राच्या संदर्भात हे पत्र वाचावे. त्या पत्राद्वारे मी आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे भाजपमधील सर्व पदे तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा कोणतीही अट न ठेवता राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्यासाठी ही अत्यंत भावनिक बाब होती की, पक्षाने माझा राजीनामा तातडीने स्वीकारण्यास नकार दिला आणि मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली.

मात्र, सखोल विचारविनिमय आणि गांभीर्याने विचार केल्यानंतर मी अंतिम निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते या पदासह भाजपच्या सक्रिय प्राथमिक सदस्यत्वातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना आणि ज्या व्यक्तींबाबत मी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे, त्या सर्व घटनांमुळे माझ्या पूर्वीच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय मी घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पक्षाध्यक्ष नितीन नवीनजी, गृहमंत्री अमित शाहजी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजी आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोषजी यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. उलट, कृतज्ञता, प्रेम, स्नेह आणि सर्वोच्च आदराच्या भावनेतून पक्षाने गेल्या काही वर्षांत मला दिलेल्या व्यासपीठासाठी आणि संधींसाठी मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, अत्यावश्यक आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे आता खासगी क्षेत्रात प्रवेश करणार आहे. मात्र, जिथे आणि ज्या स्वरूपात शक्य असेल, तिथे पंतप्रधान मोदीजी आणि भाजपच्या विचारधारा व कार्याला मी समर्थन देत राहीन. मी पक्षाची व्यवस्था सोडत आहे, विचार आणि व्यक्ती नाही. पुन्हा एकदा धन्यवाद.

follow us