Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट

  • Written By: Published:
Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट

Skymet On Monsson : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याने सर्वसामान्यांसह सर्वांनाच आता मान्यूनचे वेध लागले आहेत. मात्र, त्याआधी स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. स्कायमेटच्या या माहितीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे.

Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट

या वर्षी अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. साधारणपणे मान्सुन 22 मे रोजी अंदमानात दाखल होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी याची सुरूवात कमकुवत दिसत असल्याचे स्कायमेटनं म्हटलं आहे. साधारणपणे केरळमध्ये नौऋत्य मान्सुन 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, नैऋत्य मान्सूनबाबत आता सांगण कठीण असल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

देशामध्ये सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असताना स्कायमेटनं यंदाचा मान्सून अंदमानात उशिरा दाखल होण्याचा अंंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. तर, दुसरीकडे IMD ने अद्याप मान्सून सुरू होण्याचा अंदाज जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता आयएमडी मान्सूनबाबत काय अंदाज वर्तवते त्याकडे  सर्वसामान्यांसह बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे.

WhatsApp मध्ये करता येणार सिक्रेट चॅट; मार्क झुकरबर्ग यांनी लाँच केले तगडे फिचर

अवकळीनं कंबरडं मोडलं

काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे यासाठी पंचनामे झालेले नाही. तर काहींना नुकसानीचे पंचनामे होऊनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे अवकाळीने आधीच कंबरडं मोडल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यात आता हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने अंदमानात मान्सूस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अवकाळीने आधीचं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube