…तर अमृत काळातला पैसा जातो कुठं? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अमृत काळ म्हटलं जातंय, पण शैक्षणिक, आरोग्य, आणि कृषीचा पैसा कुठं जातो? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल चढविला असून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीकास्त्र सोडले आहे. सुळे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरल्याचं दिसून आलंय.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून वारंवार अमृत काळचा उल्लेख केला जात आहे. अमृत काळातील शिक्षण, आरोग्य, कृषीचा सेस गोळा केला जातो, तो कुठं जातो? पंतप्रधान शेतकरी योजनेची अनेकदा चर्चा केली जात आहे.
Drishyam : अभिषेक-शिवालिका विवाहबंधनात, फोटो समोर…
केंद्र सरकारडून शेतकऱ्यांकडून सहा हजारांऐवजी 8 हजार रुपये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारडून जर 16 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले तर आम्ही आणखी टाळ्या वाजवल्या असत्या, असं खोचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
Rohit Sharma Century : रोहित शर्माने ठोकले दमदार शतक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात ठरला Hero
दरम्यान, आता केंद्र सरकारकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं असून शेतसंदर्भात तरतूद तेवढीच असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलाय.
IND vs AUS 2023: जाडेजावर बॉल टॅम्परिंग आरोपानंतर, वसीम जाफरने ऑस्ट्रेलियन मीडियाची उडवली खिल्ली
नूकतंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्योजक अदानींच्या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर संसदीय भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधकांवर शेरोशायरीने टीका करत प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांप्रश्नी केंद्र सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलंय.