Video : राहुल गांधींसाठी सोनियांची जनतेला बाळासाहेबांप्रमाणे भावनिक साद; म्हणाल्या, माझा मुलगा..

Video : राहुल गांधींसाठी सोनियांची जनतेला बाळासाहेबांप्रमाणे भावनिक साद; म्हणाल्या, माझा मुलगा..

Sonia Gandhi Raebareli speech : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) त्यांच्या शेवटच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्यला सांभाळून घ्या, असं भावनिक आवाहन केलं होतं. तसंच भावनिक आवाहन कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलं. मी माझा मुलगा तुम्हाला सोपवत आहे, त्याला आपलं माना, तो तुम्हाला नाराज करणार नाही, असं सोनिया गांधी (Sonia Gandhi ) म्हणाल्या

Video : राहुल गांधींसाठी सोनियांची जनतेला बाळासाहेबांप्रमाणे भावनिक साद; म्हणाल्या, माझा मुलगा.. 

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे. दरम्यान, रायबरेली मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांची सभा आयोजित केली होती. या सभेत बोलतांना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही मला 20 वर्षे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठीही माझे घर आहे. माझ्या आयुष्यातील गोड आठवणीच या जागेशी जोडलेल्या नाहीत, तर आमच्या कुटुंबाची मुळे या मातीशी गेली 100 वर्षे जोडलेली आहेत.

आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक सॅंड्रीन बोनेअरच्या स्लो जोचं निमित्त; जॅकी श्रॉफ दिसणार मुख्य भूमिकेत 

सोनिया गांधी पुढं बोलतांना म्हणाल्या की, इंदिराजींच्या मनात रायबरेलीविषयी वेगळं स्थान होतं. त्यांच्या मनात तुमच्याविषयी लगाव होता. मी प्रियंका आणि राहुल यांना कायम सर्वांचा आदर करायला, कमजोर लोकांचं रक्षण करायला आणि अन्याया विरोधात लढायला शिकवलं. तुमच्या प्रेमाने मला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझे जे काही आहे, ते तुम्ही दिलेलं आहे. आज मी माझा मुलगा तुम्हाला सोपवत आहे. जसं तुम्ही मला आपलं मानलं, तसं राहुलला आपलं माना. राहुल तुम्हाला निराश करणार नाही, असं भावनिक आवाहन सोनिया गांधींनी केलं.

आज खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी मनापासून तुमचा ऋणी आहे. माझे मस्तक तुमच्यापुढे श्रद्धेने झुकले आहे, असंही त्या म्हणाल्या.

केरळमधील वायनाडशिवाय राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही उमेदवार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube