मोठी बातमी! राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के; ४.० रिश्टर स्केल तीव्रतेनं हादरला परीसर

Earthquake Jolts Delhi-NCR : आज सोमवार (दि. १७ फेब्रुवारी)रोजी पहाटे राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. (NCR) या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळील धौला कुआ येथे जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे ५:३६ वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम, या दिवशी होणार शपथविधी
या भूकंपात कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नसली तरी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचा धक्का जावणताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली जवळच धौला कुआ येथे ५ किलोमीटर खोली असल्याने जोरदार धक्के जाणवल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.