Gautam Adani यांच्या संपत्तीचा लिलाव करा, Subramanian Swamy यांची मागणी

Gautam Adani यांच्या संपत्तीचा लिलाव करा, Subramanian Swamy यांची मागणी

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी सध्या चर्चेत आहे. अदानींच्या संपत्तीत अचानक एवढी वाढ कशी झाली यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. यातच भाजपच्या एका माजी मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपूर्ण मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करावे आणि त्यानंतर या मालमत्तेचा लिलाव करावा. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy) यांनी केले आहे.

दरम्यान अदानी प्रकरण आणि विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेराव घालत असल्याबद्दल स्वामींना विचारण्यात आले असताना त्यांनी हे उत्तर दिले. स्वामी म्हणाले की, पंतप्रधानांनी अदानी समूहाच्या सर्व संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करावे आणि त्यानंतर लिलावातून मिळालेली रक्कम अदानी शेअर्सच्या घसरणीमुळे ज्यांचे पैसे बुडाले आहेत त्या लोकांना देण्यात यावी असे स्वामी म्हणाले आहे.

दरम्यान अदानी प्रकरणावरून नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावरून मोठा गदारोळ देखील झाला. मात्र मोदींनी आपल्या भाषणात यावर भाष्य करणे टाळले आहे.

हा वाद सुरु असताना भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला की, काँग्रेस अदानीशी व्यवहार करू शकली नाही, पण मी अनेक काँग्रेस नेत्यांना ओळखतो ज्यांनी अदानीशी व्यवहार केला आहे, अशा शब्दात स्वामींनी काँग्रेसवर प्रतिहल्ला केला आहे.

अदानी प्रकरण नेमकं आहे तरी काय?
वित्तीय फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावर शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube